गुजरातमध्ये तब्बल २५० कोटींचं ड्रग्ज जप्त, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर

गुजरातमध्ये तब्बल २५० कोटींचं ड्रग्ज जप्त, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर

गुजरातच्या (Gujrat) कच्छ जिल्ह्यातील सागरी किनारी भागात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांना तब्बल २५० कोटी रूपयांचे हेरॉईन सापडले आहे. गुजरात एटीएसने सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी रविवारी जखाऊजवळ ४९ बॅग्ज जप्त केल्या होत्या. त्यामुळे हे हेरॉईन पाकिस्तान तस्करांकडून फेकण्यात आल्याचं कनेक्शन एटीएसने स्पष्ट केलं आहे.

३० मे रोजी तटरक्षक दल आणि एटीएसने या अगोदर भारतीय सीमेअंतर्गत सात पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली होती. तर गुजरातमध्ये अंमली पदार्थांची तस्करीच्या योजना आखणाऱ्या तस्करासंबंधित मि्ळालेल्या सुचेनवरून बोटीचा कॅप्टन मोहम्मद अक्रम याने तटरक्षक दलाचे जहाज जवळ येताच दोन पिशव्या समुद्रात फेकून दिल्या होत्या, अशी माहिती गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बी. पी. रोझिया यांनी दिली.

एटीएसने हस्तगत केलेल्या ४९ बॅगमध्ये सुमारे ५० किलो हेरॉईन होतं. या प्रत्येक पॅकेटचं वजन जवळपास १ किलो होते. तर या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २५० कोटी रुपये असल्याची माहिती रोझिया यांनी दिली आहे. कारवाईदरम्यान सापडलेल्या ५० कोटी हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २५० कोटी रूपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आठवड्याभरापूर्वीच मिठाण्या गोण्यांमधून ड्रग्जची वाहतूक करण्यात आल्याचं समोर आलं होतं. मात्र या प्रकरणी बंदरामध्ये कारवाई करण्यात आली आहे.

इराणमधून मिठाच्या गोण्या असल्याचं सांगून ड्रग्ज बंदरावर उतरवण्यात आलं होतं. मात्र, तपासाअंती हे मिठ नसून अंमली पदार्थांचा साठा असल्याचं समोर आलं आहे. ही कारवाई करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा गुजरातमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.


हेही वाचा : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ५९० अंकांनी घसरला


 

First Published on: June 7, 2022 4:43 PM
Exit mobile version