हज यात्रा : शरद पवारांनी स्मृती ईराणींना लिहिले थेट पत्र…

हज यात्रा : शरद पवारांनी स्मृती ईराणींना लिहिले थेट पत्र…

Sharad Pawar

 

मुंबईः मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या तिन्ही विमानतळावर हज यात्रेकरुंसाठी समान शुल्क आकारले जावे, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती ईराणी यांना लिहिले आहे.

हज यात्रेसाठी जगभरातून लाखो मुस्लीम बांधव मक्का येथे जातात. भारतातूनही हज यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. त्यामुळे भारत सरकारकडून २२ विमानतळांवर एम्बर्केशन पॉइंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मुंबई विमानतळाच्या तुलनेत औरंगाबद येथे हज यात्रेकरुंकडून ८८ हजार रुपये अधिक शुल्क घेतले जाते. ही बाब मराठवाडा येथील काही मुस्लीम बाधवांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणली. त्याची दखल घेत शरद पवार यांनी थेट केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांना पत्र लिहिले आहे. मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर येथील विमानतळावरुन हजला जाणाऱ्यांसाठी एकच शुल्क आकारले गेले तर आनंद होईल, असे शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरवर्षी जून महिन्यात हज यात्रा होते. जगभरातून लाखो मुस्लीम हज यात्रेसाठी जातात. मुस्लीम धर्मियांच्या पाच कर्तव्यांमध्ये हज यात्रेचा समावेश आहे. कलमा, रोजा, नमाज, जकात याबरोबरीने हज यात्रेचा उल्लेख आहे. धार्मिक मान्यतांनुसार, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुसलमान व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जाण्याचं कर्तव्य निभवायला हवं.

अल्लाहने एक तीर्थस्थान बनवून समर्पित करण्यासाठी पैगंबर इब्राहिम यांना सांगितलं होतं. इब्राहिम आणि त्यांचे पुत्र इस्माईल यांनी एक दगडी इमारात बनवली. यालाच काबा संबोधलं जातं. हळूहळू लोकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या देवांची पूजा करणं सुरू केलं.पण काबाला पुन्हा पूर्वस्थितीत आणलं जावं. येथे केवळ अल्लाहची प्रार्थना करण्यात यावी, असं अखेरचे पैगंबर हजरत मोहम्मद यांनी म्हटलं. त्यामुळे इ.स. 628 पासून पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या 1400 अनुयायांसोबत एक यात्रा सुरु केली. हीच प्रथम तीर्थयात्रा मानली जाते. याच यात्रेमध्ये पैगंबर इब्राहिम यांनी धार्मिक परंपरा पुनःप्रस्थापित केली. यालाच हज म्हटलं जातं, अशी मान्यता आहे. यंदा हज यात्रा २६ जून २०२३ रोजी सुरू होत असून ०१ जुलै २०२३ पर्यंत हज यात्रा चालणार आहे.

 

First Published on: May 16, 2023 9:24 PM
Exit mobile version