इ-सिगरेटवर बंदी घाला- केंद्र सरकार

इ-सिगरेटवर बंदी घाला- केंद्र सरकार

फोटो प्रातिनिधीक आहे.

ई- सिगरेट, ई- निकोटीन आणि फ्लेवर हुक्का ही आरोग्यास हानीकारक असून अशा  ई- सिगरेटवर  बंदी घालण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सुचवले आहे. शालेय विद्यार्थी, युवक आणि महिलांमध्ये या व्यसनांचे प्रमाण वाढत असून कॅन्सरच्या रुग्णांमध्ये यामुळे वाढ होत आहे.. या सगळ्याचा विचार करुन अशा हानीकारक पदार्थांची विक्री करणाऱ्या उत्पादकांवर देखील बंदी घालण्याचे सुचवले आहे.

तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढतेय

देशातील तरुणांमधील व्यसनाधीनता वाढत आहे. विशेषत: ई सिगरेट, हुक्कासारखे प्रकार सहज उपलब्ध होतात. लहान मुले आकर्षण म्हणून ई सिगरेट, हुक्का ओढतात आणि त्यानंतर त्यांना याचे व्यसन कधी जडते ते कळत नाही. किशोरवयीन मुलांमध्ये ही हे प्रमाण वाढत आहे. एका अहवालानुसार गरोदर महिला देखील या व्यसनांच्या अधीन असून याचा विपरित परीणाम त्यांच्या गर्भातील बाळाच्या बौद्धिक क्षमतेवर होतो. अशा मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे एकूणच याचा परिणाम पाहता यावर बंदी आवश्यक आहे.

सध्या पेन हुक्का नावाचा व्यसनाचा प्रकार शाळकरी मुलांमध्ये अधूक दिसून आला आहे. नेमका पेन हुक्का म्हणजे काय यासाठी वाचा-पालकांनो  सावधान ;शाळकरी विद्यार्थी पेन हुक्क्याच्या जाळ्यात

30 देशांमध्ये बंदी

ऑस्ट्रेलिया, सिंगापूरसह ३० देशांमध्ये आधीच यावर बंदी घालण्यात आली आहे. ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायद्यांतर्गत अशा प्रकारच्या निकोटीन युक्त ई सिगरेटवर बंदी आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचे भविष्य देखील धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी याचा विचार करुन अशा उत्पादनाची विक्री, उत्पन्न, वितरण, आयात आणि जाहिरातींवर बंदी घालावी.

First Published on: August 29, 2018 1:10 PM
Exit mobile version