Heeraben Modi Demise : मुलासोबत फक्त 2 वेळाच व्यासपीठावर दिसल्या होत्या हीराबेन; काय आहे कारण?

Heeraben Modi Demise : मुलासोबत फक्त 2 वेळाच व्यासपीठावर दिसल्या होत्या हीराबेन; काय आहे कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. मध्यरात्री 3.30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली म्हणून 28 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथीलयू एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हीराबेन मोदी यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.

नरेंद्र मोदीं यांचे आपल्या आईवर खूप प्रेम होते. अनेकदा ते वेळावेळ काढून आईची भेट घेण्यासाठी जायचे. 18 जून 2022 रोजी नरेंद्र मोदींनी त्यांच्या आईचा 100 वा वाढदिवस साजरा केला त्यावेळी आईच्या आयुष्यातील संघर्षाचे अनेक किस्से त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी हे देखील सांगितलं की, त्यांची आई कधीही त्यांच्यासोबत कोणत्याही सार्वजनिक कामामध्ये का दिसत नाही? हे देखील सांगितले.

या प्रश्नाबाबत अनेक चर्चा व्हायच्या की नरेंद्र मोदी यांची आई सार्वजनिक कामांमध्ये उपस्थित का राहत नाहीत? शिवाय त्या नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरकारी घरात का राहत नाहीत?

या प्रश्नाचे उत्तर देत नरेंद्र मोदी म्हणाले होते की, पहिली गोष्ट अशी की “मी प्रधानमंत्री बनून घरातून बाहेर पडतो तेव्हा मला देखील वाटतं की, मी आई आणि माझ्या कुटुंबासोबत राहावं. मी आयुष्याच्या लहान वयातच सगळं काही सोडलं आहे. त्यामुळे माझ्या मनात मोह-माया नाही. दूसरी गोष्ट अशी की, मी आईला माझ्यासोबत बोलावले होते आणि काही दिवस तिच्यासोबत राहिलो देखील होतो. परंतु त्यावेळी आईचं मला म्हणू लागली की, तू माझ्याजवळ बसून तुझा वेळ वाया का घालवतोस?”

आई सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित का नसते यावर नरेंद्र मोदी म्हणाले की, आत्तापर्यंत आई फक्त दोनच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये माझ्यासोबत आली आहे. पहिल्यांदा जेव्हा एकता यात्रेनंतर ते श्रीनगर वरुन परतले होते तेव्हा माझे औक्षण करण्यासाठी आणि दुसऱ्यांदा त्यावेळी आली होती जेव्हा मी पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झालो होतो. 20 वर्षांपूर्वीचा शपथविधी समारंभ शेवटचा समारंभ आहे. ज्यात आई माझ्यासोबत आली होती.


हेही वाचा :

Heeraben Modi Demise : 100 वर्षांचे खडतर आयुष्य आणि 6 मुलांचा सांभाळ

First Published on: December 30, 2022 9:47 AM
Exit mobile version