केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, सात जणांचा मृत्यू

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, सात जणांचा मृत्यू

helicopter crash

नवी दिल्लीः उत्तराखंडच्या केदारनाथमधून एक दुःखद बातमी समोर येत असून, एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झालाय. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याचंही समजतंय. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले असता या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हे हेलिकॉप्टर आरएम कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे.

केदारनाथमध्ये दाट धुके असल्यानं पायलटला हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान अंदाज आला नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरच्या मदतकार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे सांगितले जात असून, त्यात पायलटसह 7 जण होते. ही दुर्घटना एवढी भीषण होती की, यात सर्वांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे गरुडचट्टीजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे.

केदारनाथमध्ये दर्शन करून भाविक परतत असताना हा अपघात झाला. जोरात स्फोट झाल्याने हेलिकॉप्टरला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रुद्रप्रयागपासून दोन किमी अंतरावर हेलिकॉप्टर कोसळले. अपघाताच्या ठिकाणी दाट धुके असून, हलकीशी बर्फवृष्टीही होत आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम बचाव कार्यात सहभागी आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेबाबत उत्तराखंड सरकारशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.


हेही वाचाः आमदार संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका, उपचारांसाठी औरंगाबादहून मुंबईत दाखल

First Published on: October 18, 2022 12:20 PM
Exit mobile version