पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम सिंग दोषी

पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम सिंग दोषी

राम रहीम सिंगचा फाइल फोटो

हरियाणाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख संत गुरमीत राम रहीम सिंग याला न्यायलयाने दोषी ठरवले आहे. १६ वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याकांडाचा खटला सीबीआय न्यायालयात सुरु होता. न्यायाधीश जगदीप सिंग यांनी राम रहीमला दोषी ठरवले आहे. राम रहीमसोबतच अन्य चार आरोपींनाही दोषी ठरवण्यात आले आहे. राम रहीम आणि अन्य आरोपींना १७ जानेवारी रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. या निर्णयामुळे आता राम रहीमचे समर्थक हे आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या शिक्षेची सुनावणी पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयात होणार आहे.

लैंगिक अत्याचार प्रकरणी ही दोषी

यापूर्वीही लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून राम रहीमला अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. राम रहीम यांना मुक्त करण्याच्या मागणीवरुन त्याच्या समर्थकांनी ठिक ठिकाणी जाळपोळ केली होती. राम रहीमला व्हिडिओ कॉन्फ्रेंरसद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयात प्रसारमाध्यमांना प्रवेश दिला गेला नव्हता.

पंचकूला येथील सीबीआय न्यायालयाबद्दल माहिती देताना डीसीपी कमलदीप गोयल यांनी सांगितले की,”मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.न्यायालय परिसरात काही घडू नये यासाठी ५०० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.”

First Published on: January 11, 2019 4:45 PM
Exit mobile version