India Ratings : घराचं स्वप्न भंगलं! घर खरेदीच्या किमतीत 12 टक्क्यांची वाढ

India Ratings : घराचं स्वप्न भंगलं! घर खरेदीच्या किमतीत 12 टक्क्यांची वाढ

India Ratings : घराचं स्वप्न भंगल! घर खरेदी किंमतीत 12 टक्क्यांची वाढ

स्वत:चे हक्काचे घर खरेदी करण्याचे किंवा बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण वाढत्या महागाईबरोबर आता घरांच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत घरं खरेदी करण्याचं स्वप्नांवर अखेर विरजण पडली आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२२) घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. घरांच्या किमती (Home prices Rise) तब्बल 8 टक्क्यांनी वाढणार आहेत. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने (ndia Ratings Agency) याबाबत माहिती दिली आहे. अंतिम वापरकर्त्यांकडून मागणी वाढल्यामुळे ही वाढ होऊ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

रेटिंग एजन्सीने जारी केले निवेदन

रेटिंग एजन्सीने सोमवारी एका निवेदनात माहिती दिली की, “घरांच्या विक्रीतील तेजी आणि वाढलेली मागणी अंतिम वापरकर्त्यामुळे आहे, त्यामुळे किंमतींमध्ये वाढ होईल. गेल्या आर्थिक वर्षात अखिल भारतीय स्तरावर घरांच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या होत्या.

निवासी मालमत्तेच्या किमतीत होणार वाढ

भारतात घरांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे किमती इतक्या वेगाने वाढलेल्या नाहीत. निवेदनानुसार, एजन्सीला 2022-23 या आर्थिक वर्षात निवासी मालमत्तेच्या किमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

‘या’ शहरांमध्ये किंमत वाढेल

बेंगळुरू, मुंबई, पुणे आणि हैदराबादमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला अखिल भारतीय स्तरावर सुमारे आठ टक्के वाढ दिसून येईल. एजन्सीच्या मते, चालू आर्थिक वर्षात घरांची विक्री वार्षिक आधारावर सुमारे 12 टक्क्यांनी वाढेल.

घरांच्या किमती का वाढणार?

वाढत्या मागणीमुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने सिमेंटच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात सिमेंटच्या किमती मासिक आधारावर दोन ते तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, वर्षअखेरीस उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सिमेंटच्या उत्पादनालाही गती देण्यात आली, मात्र त्यामुळेही सिमेंटच्या किमतीवर नियंत्रण मिळवता आले नाही.


Petrol Diesel Price: सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर


First Published on: April 26, 2022 9:19 AM
Exit mobile version