पतंजली, डाबरसह १३ कंपन्यांच्या मधात साखरेचा पाक!

पतंजली, डाबरसह १३ कंपन्यांच्या मधात साखरेचा पाक!

कोरोनाच्या काळात आरोग्यास मध चांगला असल्यामुळे त्यामध्ये वाढ झाली. पण अनेक बड्या कंपन्यांच्या मध भेसळयुक्त असल्याचे समोर आले आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंट (CSE)ने केलेल्या तपासात पंतजली, डाबरसह १३ छोट्या, बड्या कंपन्यांच्या मधात साखरेचा पाक वापरत असल्याची बाब उघड झाली आहे. मधात मोठ्या प्रमाणात साखर असल्याचे म्हटले जात आहे. पण हा कंपनीला बदनाम करण्याचा कट असल्याचा दावा पतंजली कंपनीचे सहसंस्थापक बालकृष्ण यांनी केला आहे.

माहितीनुसार, १३ छोट्या-मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले गेले. यामध्ये कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचे दिसून आले आहे. न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या मध शुद्धेतच्या तपासणाऱ्या चाचणीत पतंजली, डांबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयासारख्या कंपन्यांच्या मध अयशस्वी ठरला आहे. मात्र या चाचणीवर पतंजली आणि डाबर या कंपनीने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. भारतात मिळणारा नैसर्गिक रित्या मध एकत्र करून तो विक्री केला जातो. त्यामुळे कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा हा या चाचणीचा हेतू असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे.

या कंपन्यांनी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटीच्या (FSSAI) नियमांचे पालन करण्यात आल्याचे म्हटले आहे. डाबर कंपनीचे प्रवक्ते म्हणाले की, ‘कंपनीचा मध जर्मनीमध्ये झालेल्या एमएमआर चाचणी यशस्वी ठरला होता. आमच्या कंपनीचा मध १०० टक्के शुद्ध आहे. मधाचे ठरवलेले २२ मापदंड आम्ही पूर्ण करतो. आता आलेला अहवाला हा प्रायोजित असल्याचे वाटत आहे.’ माहितीनुसार, मधाच्या २२ मापदंडांपैकी काही कंपन्या केवळ ५ मापदंडांमध्ये खऱ्या उतरल्या आहेत.


हेही वाचा – मसाल्यांचा बादशाह ‘MDH’ कंपनीच्या मालकाचे निधन


 

First Published on: December 3, 2020 11:32 AM
Exit mobile version