घरदेश-विदेशमसाल्यांचा बादशाह ‘MDH’ कंपनीच्या मालकाचे निधन

मसाल्यांचा बादशाह ‘MDH’ कंपनीच्या मालकाचे निधन

Subscribe

आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. आज (३ डिसेंबर) सकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुलाटी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरेही झाले होते. परंतु आज सकाळी दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मपाल गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते.

- Advertisement -

गेल्याच वर्षी धर्मपाल गुलाटी यांना व्यापार आणि खाद्यप्रक्रिया क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. पद्मभूषण धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाने आर्य समाजासह देशात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

धर्मपाल हे एक समाजसेवक देखील होते. त्यांनी अनेक शाळा आणि रुग्णालये देखील सुरू केली. करोना संसर्गाच्या काळात त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ७५०० पीपीई किट देखील उपलब्ध केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -