गुजरातमध्ये भीषण अपघात, बस-कारच्या धडकेत नऊ जणांचा जागीच मृत्यू

गुजरातमध्ये भीषण अपघात, बस-कारच्या धडकेत नऊ जणांचा जागीच मृत्यू

Gujarat Accident | अहमदाबाद – गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात शनिवारी सकाळ-सकाळीच मोठा अपघात घडला आहे. बसचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस समोरून येणाऱ्या एसयुव्ही कारला जाऊन धडकली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून २८ पेक्षा अधिक जण जखमी असल्याचे वृत्त आहे. यापैकी अनेकांची परिस्थिती गंभीर आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पहाटे पाच वाजता हा अपघात घडला. चालत्या गाडीत बसचालकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या कारला धकड बसली. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २८ पेक्षा जास्त प्रवासी जखमी आहेत. अपघातानंतर ११ जणांना नवसारी येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, १७ जणांना वलसाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी प्रवाशांवर सूरतच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमित शहा यांनीही या घटनेची दखल घेत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ‘गुजरातच्या नवसारी येथील रस्ते अपघात भीषण आहे. या घटनेत ज्य लोकांनी आपल्या कुटुंबीयांना गमावलं आहे त्यांच्याप्रति आमच्या संवेदना आहे. इश्वर त्यांना त्यांचं दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी रुग्णांवर स्थानिक प्रशासनाने त्वरीत उपचार करावेत. जखमी रुग्ण लवकरच बरे होण्याची प्रार्थना करतो,’ असं ट्वीट अमित शाहा यांनी केलं आहे.

First Published on: December 31, 2022 9:25 AM
Exit mobile version