छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे दिल्लीत किती रस्ते आहेत? सुधांशू त्रिवेदी यांचा पुन्हा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे दिल्लीत किती रस्ते आहेत? सुधांशू त्रिवेदी यांचा पुन्हा सवाल

अहमदाबाद – महापुरुषांच्या कतृत्त्वावरून सध्या राजकारण पेटलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी प्रकरण पेटवलं असताना भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी सुधांशू त्रिवेदी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा – काँग्रेस राजघराणे, त्यांच्यासमोर माझी पात्रता नाही; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर पलटवार

सुधांशु त्रिवेदी म्हणाले, राजकारणात एक गोष्ट असते, काय बोललं यापेक्षा कोण बोललं हे महत्त्वाचं असतं. मी केवळ एवढचं नम्रपणे सांगू इच्छितो की, हिंदू, हिंदू धर्म, हिंदुत्व आणि भारतीय इतिहासात हिंदुत्वाचे सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराजांबाबत, जर कोणी विचार केला की माझ्या मनात किंचितही अवमान असू शकतो, तर मला असं वाटतं एकतर त्याने स्वत:च्या बुद्धीबाबत विचार केला पाहिजे, स्वत:च्या दृष्टिकोनावर विचार केला पाहिजे. तसेच मी जो शब्द बोललो नाही त्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा सवाल आहे की, दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने किती रस्ते आहेत. औरंगजेबाच्या संपूर्ण कुटूंबाच्या नावांवर रस्त्यांची नावे आहेत. बाबर रोड, हुमायू रोड, अकबर रोड, शाहजहा रोड, औरंगजेब रोड, तुम्ही दगडावर काय लिहिलं आणि पुस्तकांमध्ये औरंगजेबाची प्रशंसा व महानता लिहिली. यामुळे मी म्हणतोय की राजकारणात महत्त्व या गोष्टीला आहे की कोण बोलतंय?

हेही वाचा – SCचा निर्णय पूर्णतः चुकीचा, राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडल्याप्रकरणी काँग्रेस नाराज

सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले होते?

सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं रणनिती म्हणून माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं होतं. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

First Published on: November 22, 2022 10:00 AM
Exit mobile version