Stand Up India Loan Scheme या योजनेतून १ कोटींचे लोन कसे मिळवाल?

Stand Up India Loan Scheme या योजनेतून १ कोटींचे लोन कसे मिळवाल?

Stand Up India Loan Scheme या योजनेतून १ कोटींचे लोन कसे मिळवाल?

देशातील अनुसूचित जाती, जमाती आणि महिला वर्गातील उद्योजकांसमोरील आव्हान, अडचणी लक्षात घेत केंद्र सरकारने 5 एप्रिल 2016 रोजी स्टँड अप इंडिया योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून तळागाळातील उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगारनिमिर्तीसाठी उपाययोजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यामातून केंद्र सरकार देशातील अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उद्योकांना चालना देण्यासाठी १० लाखांपासून ते १ कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देते. या योजनेला २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

स्टँड अप इंडिया योजनेचे मुख्य उद्दिष्ट, महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अशा समाजातल्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा आहे. त्यासाठी, उद्योग करण्यास तयार आणि प्रशिक्षणार्थी अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना कर्ज देऊन त्यांना उत्पादन, सेवा किंवा व्यापार आणि कृषी संलग्न उद्योगक्षेत्रात ग्रीन फिल्ड कंपन्या सुरु करण्यासाठी मदत करण्याचे काम या योजनेद्वारे केले जाते.

स्टँड अप इंडिया योजनाच्या माध्यमातून व्यावयायिकांना अगदी कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध होते. तसेच ३ वर्षे इनकम टॅक्समधून सूट मिळते. यानंतर बेस रेटसह ३ टक्के व्याजदर लागू होते. जो टेन्योर प्रामियमहून अधिक नसतो. हे कर्ज पर फेडण्यासाठी ७ वर्षाची मुदत दिली जाते. मोरेटोरियमचा कालावधी १८ महिने आहे.

ही योजना सुरू झाल्यापासून 23 मार्च 2021 पर्यंत स्टँड अप इंडीया अंतर्गत 1,14,322 पेक्षा जास्त खात्यांसाठी 25,586 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या अनुसूचित जातीच्या व्यावसायिक खातेदारांची संख्या १६ हजार २५८ इतकी असून त्यांना ३३३५.८७ रुपये कर्ज मंजूर झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या खातेदारांची संख्या ४ हजार ७० असून त्यांना आत्तापर्यंत १०४९.७० रुपये रक्कम मंजूर झाली आहे. तर महिला व्यावसायिक खातेदारकांची संख्या तब्बल ९३ हजार ९४ इतकी असून त्यांना २१२००.७७ रुपये रक्कम मंजूर झाली आहे.

या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकेल ?

१) 18 वर्षे पेक्षा अधिक वय असलेल्या अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती किंवा महिला.

२) केवळ ग्रीन फिल्ड प्रकल्प सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध.

३) सामूहिक उद्योग किंवा कंपनी असल्यास, त्यातील किमान 51 टक्के नियंत्रित मालकी हिस्सा अनुसूचित जाती -जमातीच्या व्यक्ती किंवा महिलांचा असायला हवा.

४) कर्जदारांनी इतर कोणत्याही बँकेचे अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज बुडवलेले नको.

या योजनेअंतर्गत कर्ज घेण्याची प्रक्रिया-

शेड्युल्ड व्यावसायिक बँकेच्या मार्फत तीन मार्गांनी कर्ज मिळवता येऊ शकेल.

• थेट बँकेच्या शाखेतून,

• स्टँड अप इंडीया पोर्टल च्या माध्यमातून (www.standupmitra.in)

• लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर (LDM) च्या मार्फत.


 

First Published on: April 4, 2021 3:59 PM
Exit mobile version