वटवाघळात शेकडो कोरोना विषाणू; भविष्यात पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा प्रसार

वटवाघळात शेकडो कोरोना विषाणू; भविष्यात पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा प्रसार

कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात आतापर्यंत बरेच संशोधन केलं गेलं आहे आणि चालू आहे. आतापर्यंत केलेल्या अनेक संशोधनातून कोरोनाच्या उत्पत्तीच्या मागे फक्त वटवाघुळ आहे, असं दिसून येतंय. चीनमध्ये केलेल्या संशोधनात हीच गोष्ट उघडकीस आली आहे, तर आता हीच गोष्ट समोर आली, आता अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर पॉली केनन यांच्या संशोधनात देखील हीच बाब समोर आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील वृत्तानुसार, कोरोना विषाणू आणि गेल्या दशकात आलेले संसर्गजन्य रोग वन्यजीवांशी संबंधित आहेत. विद्यापीठाच्या प्रोफेसर पॉली केनन म्हणाल्या, “आम्ही अशी परिस्थिती निर्माण केली ज्यामुळे अल्पकाळात हे सर्व घडलं. थोड्या कालावधीने पुन्हा होईल.” शास्त्रज्ञांना अद्याप याची खात्री नाही की कोरोना संक्रमण कसं सुरू झालं, परंतु त्यांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणू वटवाघळामुळे पसरला आहे.

कॅननच्या म्हणण्यानुसार, संशोधनातून पुरेसे पुरावे समोर आले आहेत की कोरोना विषाणू केवळ वटवाघळाद्वारेच मानवांमध्ये पसरला आणि नंतर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत पसरला. कॅननच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू चीनमधील वुहान शहरातील मांस बाजारातून मानवांमध्ये पसरला. महत्त्वाचं म्हणजे या बाजारात जिवंत वन्यजीव विकले जातात आणि हे चीनमधील सर्वात मोठी मांस बाजारपेठ आहे. तसंच असंही म्हटलं आहे की काही वर्षांपूर्वी मर्स आणि सार्सचंही संक्रमण असंच झालं होतं. यामागचं कारणही तेच प्राणी होते.


हेही वाचा – कोरोनाचा प्रसार वाढला, मात्र चाचण्या अद्याप कमी – सोनिया गांधी


मर्स विषाणू वटवाघळापासून उंटांमध्ये पसरला आणि उंटांमधून मानवांमध्ये संसर्ग झाला. त्याच वेळी, सार्स वटवाघळापासून मांजरींमध्ये आणि तेथून मानवांमध्ये पसरला. इबोला विषाणूदेखील मानवात वटवाघळामधून आला असावा, असं संशोधन पथकाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. १९७६, २०१४ आणि २०१६ या वर्षात आफ्रिकेतही या विषाणूमुळे बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला होता. केनन यांच्या म्हणण्यानुसार, संशोधनादरम्यान त्याला कोरोना विषाणूचे असे अनेक अनुवांशिक कोड सापडले आहेत, जे वटवाघळामध्ये आढळतात.

परंतु, पॅनोलिन त्याच्याशी थेट संपर्कात आला आहे की वटवाघळातून त्याच्यात हा विषाणू आला आहे की नाही याबद्दल केनन यांना खात्री नाही आहे. त्यांच्या मते, कोरोना विषाणूच्या शेकडो जाती वटवाघळामध्ये आढळतात. भविष्यात अधिक कोरोना विषाणू मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतात अशी भीती त्यांना आहे. तथापि हे १०० वर्षांतून एकदाच घडते. परंतु जेव्हा हे घडेल, तेव्हा जंगलात आग पसरते तसं संपूर्ण जगात पसरेल.

कोरोनाचा प्रसार

First Published on: April 23, 2020 9:26 PM
Exit mobile version