अरबी समुद्रात बुडले व्यापारी जहाज, तटरक्षक दलाने वाचवले 22 जणांचे प्राण

अरबी समुद्रात बुडले व्यापारी जहाज, तटरक्षक दलाने वाचवले 22 जणांचे प्राण

अरबी समुद्रात बुडणाऱ्या एका व्यापारी जहाजातील 22 जणांचे प्राण वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आलं आहे. एमटी ग्लोबल किंग आय या व्यापारी जहाज अरबी समुद्रातून प्रवास करत असताना अचानक बुडाले यावेळी भारतीय तटरक्षक दलाने जहाजातून सर्व २२ क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. ICG जहाजे आणि ALH ध्रुव पोरबंदर येथून समुद्रात 93 नॉटिकल मैल अंतरावर बचाव कार्य करण्यासाठी सोडण्यात आले.

सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 20 भारतीयांसह 1 पाकिस्तानी आणि 1 श्रीलंकन नागरिकाचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या लोकांना ICG जहाजे आणि हेलिकॉप्टरद्वारे पोरबंदर बंदरात आणले जात आहे. अशी माहिती ICG अधिकाऱ्याने दिली आहे.

आयसीजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील खोर फक्कन येथून निघाले होते. हे जहाज गुजरातमार्गे कर्नाटकात जात होते. याच दरम्यान पोरबंदर किनारपट्टीजवळ हे जहाज वादळाच्या तडाख्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरच्या मदतीने जलद बचाव मोहीम राबवत सर्व २२ क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.

ICG ने असे म्हटले आहे की, ICG ने बचाव कार्यासाठी नव्याने सुरू केलेले ALH ध्रुव हेलिकॉप्टर तैनात केले होते. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सेफ्टी बोटीही पाण्यात बुडाल्या होत्या. यादरम्यान हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्यात करतानाही अनेक अडचणी आल्या. मात्र भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले आहे.


टोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना सूचना, आषाढी एकादशीच्या नियोजनाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा


First Published on: July 6, 2022 6:52 PM
Exit mobile version