Paytm Offer : LPG सिलिंडरची Paytm वरून नोंदणी केल्यास मिळणार ३ हजार पर्यंतचा कॅशबॅक, जाणून घ्या स्कीम ?

Paytm Offer : LPG सिलिंडरची Paytm वरून नोंदणी केल्यास मिळणार ३ हजार पर्यंतचा कॅशबॅक, जाणून घ्या स्कीम ?

देशात सिलिंडरच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. परंतु पेटीएमने आता LPG सिलिंडरची नोंदणी केल्यास एक खास ऑफर जाहीर केली आहे. ती म्हणजे पेटीएमवरून LPG सिलिंडरची नोंदणी केल्यास ३ हजार रूपयांचा कॅशबॅक परत मिळणार आहे. हा कॅशबॅक तुम्हाला तीन वेळा मिळू शकतो. सिलिंडरच्या बुकिंगसाठी तुम्हाला पेटीएम व्हॉलेट, यूपीआय आणि नेटबँकींगच्या माध्यमातून पेमेन्ट करावं लागणार आहे. ही ऑफर फक्त त्याच लोकांसाठी आहे. ज्या लोकांनी अजूनपर्यंत Paytm वरून LPG सिलिंडरची नोंदणी केली नसेल. त्यांच्यासाठीच ही खास ऑफर असणार आहे.

काय आहे Paytm ची ऑफर ?

पेटीएम वरून पहिल्या तीन गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर प्रति बुकिंग १००० रूपये पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. हा कॅशबॅक पहिल्या बुकिंगवर १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत असू शकतो. दुसरा आणि तिसरा सिलिंडर बुक केल्यावर तुम्हाला स्क्रॅच कार्डमध्ये ५ ते १००० रूपये पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

पहिल्या सिलिंडरची नोंदणी कधी कराल?

Paytm वरून जर ग्राहक पहिल्या सिलिंडरची नोंदणी करत असतील तर या महिन्यातील डिसेंबर अखेरच्या महिन्यांपर्यंत करू शकता. त्यानंतर ऑफर सुरू होईल. पहिलं कॅशबॅक स्क्रॅच गार्ड युझर्सला मिळणार आहे. तर यूझर्सला उर्वरीत दोन सिलिंडरची नोंदणी पुढील २ महिन्यात करावी लागणार आहे.

कधी येणार कॅशबॅक ?

गॅस नोंदणी यशस्वी झाल्यानंतर एक स्क्रॅच गार्ड मिळेल. त्यामध्ये तुम्ही आपलं कॅशबॅक क्लेम करू शकता. जर सुरूवातीला स्क्रॅच गार्ड ओपन नाही झालं तर कॅशबॅक अँण्ड ऑफर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. ट्रान्झेक्शन झाल्यानंतर जवळपास २४ तासांमध्ये स्क्रॅच कार्ड मिळेल.

First Published on: December 14, 2021 5:14 PM
Exit mobile version