गुजरातमध्ये काँग्रेस सरकार आले तर, मोफत वीज आणि कर्जमाफी देण्याचे राहुल गांधींचे आश्वासन

गुजरातमध्ये काँग्रेस सरकार आले तर, मोफत वीज आणि कर्जमाफी देण्याचे राहुल गांधींचे आश्वासन

गुजरातमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे(gujarat assembly election 2022). आम आदमी(aap) पक्षापासून ते भाजपपर्यंत(bjp) सर्वच पक्ष आपापल्या परीने निवडणुकांची जोरदार तयारी करण्यात व्यस्त आहेत. भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा करत असताना राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये जुनी पेन्शन व्यवस्था पुन्हा सुरू केली जाईल. तयच संदर्भात मंगळवारी एका ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी पेन्शन व्यवस्थेचा विषय काढत भाजपवर निशाणा साधला.

हे ही वाचा – खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पध्दत; पत्राचाळ प्रकरणी ईडीने शरद पवारांचे नाव घेतलेले नाही : महेश तपासे

राहुल गांधी(rahul gandhi) यांनी ट्विट करून म्हटले की, ‘भाजपने जुनी पेन्शन येजना रद्द केली आणि वृद्धांना स्वावलंबी बनवले. जुनी पेन्शन हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुढे म्हणाले की, राजस्थान आणि छत्तीसगडप्रमाणे गुजरातमध्ये(gujrat) काँग्रेसचे सरकार आल्यास जुनी पेन्शन व्यवस्था पुन्हा सुरू केली जाईल. असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

हे ही वाचा –  राज ठाकरेंनी एकाचवेळी खरेदी केले चार केक; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केले होते आंदोलन

यात महत्वाची बाब अशी आहे की, हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन प्रणाली पूर्ववत सुरू करण्यात यावी नुकतेच आंदोलन केले होते. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे.

500 रुपयांना सिलिंडर आणि मोफत वीज जाहीर

याआधीही राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा केल्या होत्या. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल असे राहुल गांधी म्हणाले होते. यासोबतच 500 रुपयांना एलपीजी सिलिंडर, शेतकऱ्यांना मोफत वीज आणि सर्वसामान्य ग्राहकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन राहुल गांधींनी जनतेला दिले होते. दरम्यन राजुल गांधी हे ‘भारत जोडो यात्रे’त आहेत. ७ सप्टेंबर २०२२ पासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली.

हे ही वाचा –  बाळासाहेब ठाकरे शरद पवारांवर टीका करायचे यातच गंमत आहे, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

First Published on: September 20, 2022 7:48 PM
Exit mobile version