घरमहाराष्ट्रराज ठाकरेंनी एकाचवेळी खरेदी केले चार केक; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

राज ठाकरेंनी एकाचवेळी खरेदी केले चार केक; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Subscribe

राज ठाकरे जी वक्तव्यं करतात त्याची नेहमीच चर्चा होत असते. त्याच प्रमाणे कालही राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्याची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(mns) अध्यक्ष राज ठाकरे(raj thackeray) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे. आगामी निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन विदर्भातसुद्धा पक्ष बांधणी करण्यासाठी राज ठाकरेंचा हा दौरा महत्वपूर्ण आहे. राज ठाकरे सोमवारी संध्याकाळी चंद्रपूर मध्ये दाखल झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान राज ठाकरे यांनी चंद्रपूर शहरातील एन. डी. हॉटेल मधल्या केक शॉप(cake shop) यामध्ये जाऊन स्वखर्चाने चार केक खरेदी केले आणि हॉटेल रूमच्या दिषेने निघाले. राज ठाकरे यांनी केक खरेदी केले त्याचीच आता चर्चा रंगत आहे.

हे ही वाचा – ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुन्हा नंबर 1 पक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

- Advertisement -

राज ठाकरेंनी(raj thackeray) अचानक चार केक का खरेदी केले? असं त्यांना विचारण्यात आल्यावर केक खरेदी करण्याचं काही विशेष कारण नाही असं राज ठाकरे म्हणाले. चंद्रपूर मधील स्थानिक पदाधिकाऱ्यांना संबोधित करून ते अमरावती दौऱ्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान याच संदर्भात केक शॉपचे मालक म्हणाले, राज ठाकरे यांनी आमच्या दुकानातून चॉकलेट केक, बटरस्कॉच केक आणि पाईन अँपल अशा चार प्रकारचे केक यांनी खरेदी केले.

हे ही वाचा –  MNS Raj Thackeray : भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(mns) अध्यक्ष राज ठाकरे(raj thackeray) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत राज ठाकरेंचा हा दौरा एकूण आठ दिवसांचा असणार आहे . या दौऱ्यामध्ये राज ठाकरे पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. राज ठाकरे जी वक्तव्यं करतात त्याची नेहमीच चर्चा होत असते. त्याच प्रमाणे कालही राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्याची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती. शहरातील प्रस्थापितांविरोधात संघर्ष करा, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याचबरोबर मनसे आणि शिवसेनाही एकत्र येणार का या चर्चा सुद्धा रंगत आहेत.

हे ही वाचा – नाशिक तालुक्यात राष्ट्रवादी, भाजपचा वरचष्मा; सेनेची पिछेहाट

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -