आयआयटी मद्रासमध्ये 1199 ची रिकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट; एक उमेदवाराला 1.99 कोटींचे पॅकेज

आयआयटी मद्रासमध्ये 1199 ची रिकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट; एक उमेदवाराला 1.99 कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली : आयआयटी मद्रासच्या इंजिनियरिंगच्या उमेदवारांसाठी यावर्षी रिकॉर्ड ब्रेक 1199 जॉब ऑफर मिळाल्या आहेत. तर 231 विद्यार्थ्यांना प्री- प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत. यामुळे एकूण 1430 उमेदवारांना आयआयटी मद्रासकडून जॉब ऑफर मिळाल्या आहेत. यातील एका विद्यार्थ्याला सर्वाधिक म्हणजे 1.99 कोटी रुपये पगाराची ऑफर देण्यात आली आहे. ज्याचा सरकारी पगार 21.5 लाख रुपये होता. प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या 80 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

आयआयटी मद्रासने 2018 – 19 मध्ये 1151 ऑफर्ससह सर्वाधिक ऑफर्सचा रेकॉर्ड नोंदवला आहे. यावेळी एकूण 380 कंपन्यांनी दोन टप्प्यांमध्ये या नोकऱ्या ऑफर केल्या. यापैकी 14 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी 45 जागांसाठी जॉब ऑफर्स केल्या. त्याचप्रामाणे 131 स्टार्टअप्सनी 199 जॉब ऑफर्स दिल्या होत्या. संस्थेच्या मॅनेंजमेट स्टडीज विभागातील सर्व 61 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. संस्थेचे प्लेसमेंट सल्लागार प्रा.सीएस शंकर राम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच हा विक्रम झाला आहे.

या कंपन्यांनी दिल्या ऑफर्स

१) जपानी कंपनी राकुटेन मोबाईल कंपनीने सर्वाधिक म्हणजे 11 ऑफर्स दिल्याय

२) तर कोर इंजिनियरिंग आणि टेक्नॉलॉजी सेक्टरने 41 टक्के नोकऱ्या ऑफर केल्या.

३) यानंतर डेटा सायन्स आणि अॅनालिटिक्स, आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातून 17 टक्के ऑफर्स होत्या.

४)सर्वाधिक ऑफर इएक्सएल सर्विस (ELX Service) , ओला मोबिलिटी (Ola Mobility), ईवाय इंडिया (EY India), अमेरिकन एक्सप्रेस (American Express), मायक्रोसॉफ्ट इंडिया (Microsoft India), आयक्यूव्हीआयए (IQVIA), एल अँड टी (L&T), क्वालक़ॉम (Qualcomm), कोटक महिंद्रा (Kotak Mahindra) द्वारे देण्यात आल्या आहेत.

५) तर प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ग्लीन, मायक्रॉन टेक्नॉलॉजीज, होंडा आर अँड डी, कोहेसिटी, दा विंची डेरिव्हेटिव्ह्ज, एक्सेंटुअर जपान, मनी फॉरवर्ड यांचा समावेश आहे.


ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; वयाच्या 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

First Published on: August 9, 2022 10:27 AM
Exit mobile version