धक्कादायक! पत्नीच्या प्रियकरासह बसून ओढली बीडी अन् गळा कापून केली हत्या

धक्कादायक! पत्नीच्या प्रियकरासह बसून ओढली बीडी अन् गळा कापून केली हत्या

पत्नीसह असलेल्या अवैध संबंधांमुळे चिडलेल्या नवऱ्याने पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्येच्या आदल्या दिवशी पतीने रात्री साडेसहाच्या सुमारास पत्नीच्या प्रियकराबरोबर बीडी ओढण्याच्या बहाण्याने भेट घेतली आणि त्याला ठार मारले. हा खळबळजनक प्रकार उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर जिल्ह्यातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी जमालपूरमध्ये मिरजापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पत्नीशी अवैध संबंध असल्यामुळे संतप्त पतीने या हत्येची घटना घडवून आणली होती. पोलिसांनी आरोपी युवकास अटक केली व त्यातून हत्या करण्यासाठी वापरलेला फावडा जप्त करुन आरोपीस तुरुंगात पाठविले आहे. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २० ऑगस्ट २०२० रोजी जमालपूर पोलिस स्टेशन परिसरातील बिंदपुरवा येथे मुन्नीलाल बिंद हत्याकांडातील आरोपी बिहारी यादव याने ही हत्या केली होती.

असा घडला प्रकार

मृत मुन्नीलाल बिंद गावात एकटा झोपडीत राहत होता. दरम्यान, त्याचे बिहारीलाल यांच्या पत्नीशी संबंध होते. बिहारी लाल यांनी मुन्नीलाल यांना पत्नीसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. आरोपी २० ऑगस्टच्या रात्री दीड वाजेच्या दरम्यान खुनाच्या हेतूने मुन्नीलालच्या झोपडीपर्यंत पोहोचला. दोघांनी मिळून बिडी ओढली, त्यानंतर बिहारीलालने तिथे असलेले फावडे मारून त्याला ठार केले आणि तेथून पळून गेला होता.

तपास करत असलेल्या पोलिसांनी आरोपी बिहारीलाल यादव याला दैतवीर बाबा मंदिर गाव बिंदपुरवा येथून अटक केली आहे. एसपी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, जमालपूरमध्ये मुन्नीलालची गळा कापून अज्ञात लोकांनी हत्या केली होती. यात पत्नीबरोबर अवैध संबंध ठेवल्यामुळे मुन्नीलाल यांची हत्या करण्यात आली.


ऑनलाईन क्लासदरम्यान मुलांसमोरच झाला शिक्षिकेचा मृत्यू!

First Published on: September 6, 2020 1:51 PM
Exit mobile version