Monsoon Rain 2021: मान्सूनने दिल्लीसाठी चुकवला IMDचा अंदाज अन् आज झाली एन्ट्री

Monsoon Rain 2021: मान्सूनने दिल्लीसाठी चुकवला IMDचा अंदाज अन् आज झाली एन्ट्री

Weather Forecast : पुढील ३ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम! हवामान विभागाचा अलर्ट

दिल्लीतील मान्सून येण्याचा अंदाज सतत चुकत असल्यामुळे संसदीय समितीची चिंता समोर आली आहे. याबाबत समितीने भारतीय मौसम विज्ञान विभागाला (IMD) कोंडीत पकडले आहे. समितीने याचे कारण आणि पुढील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली आणि मौसम विभागासोबत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), खासगी एजन्सी स्कायमेट वेदरच्या टीम बोलवण्यात आले. या बैठकीच्या निष्कर्षांचा लवकरच एक अहवाल संसदेत ठेवला जाईल. खासदार जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तनवर राज्यसभाच्या स्थायी समितीने दोन दिवसांपूर्वी ही बैठक पार पडली. आयएमडीचे अनेक अंदाज चुकल्यानंतर आज दिल्लीत पाऊस दाखल झाला आहे.

दरम्यान समितीने घेतलेल्या बैठकीमध्ये केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्र आणि स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावतसह अनेक तज्ञ उपस्थित होते. बैठकीमध्ये तिन्ही एजेन्सीला राज्यांनुसार सध्याच्या आणि भविष्यातील मान्सूच्या स्थितीबाबत स्वतंत्र प्रेजेंटेशन देण्यास सांगितले. आयएडीने सांगितले की, मान्सूनचा अंदाज पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या मॉडेलवर आधारित असते. परंतु चार आठवड्यापूर्वीच्या अंदाजानुसार या दोन्ही मॉडेलकडून योग्य अंदाज मिळाला नाही. केरळमध्ये मान्सून येण्याबाबत जो चुकीचा अंदाज लावला गेला, तेव्हा योग्य अंदाज लागत नाही आहे. दरम्यान आयएमडीच्या मतावर स्कायमेट वेदन आणि सीएमआयआर यांची एकमत आहे. उशीर झाल्यामुळे मान्सून सामान्य राहिलं. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होणारा पाऊस जून-जुलै महिन्याची कमी भरून काढले. शिवाय मान्सून उशीरा पर्यंत राहिलं. ऑक्टोबरपर्यंत मान्सून असण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – हिमाचलमध्ये ढगफुटी, नद्यांना पूर


 

First Published on: July 13, 2021 1:12 PM
Exit mobile version