वडिलांच्या संपत्तीवर मुलींच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

वडिलांच्या संपत्तीवर मुलींच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Governor expected to take decision on Bill as soon as possible - Supreme Court

सर्वसाधारणपणे हिंदू परंपरेत मुली आपल्या वडिलांच्या संपत्तीवर दावा करत नाहीत. परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. जर एखाद्या हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता जग सोडून गेला तर स्वतः कमावलेली संपत्ती आणि वारसाहक्काने मिळालेली संपत्तीत मुलींचाही वाटा असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये प्राधान्य मिळेल. याचा अर्थ असा आहे की, वडिलांच्या भावांना आणि वडिलांच्या मुलाच्या मुलीलाही यात प्राधान्य मिळेल.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ज्या महिलेचा मृत्यू विना मृत्यूपत्र होतो, तसेच तिला कोणतेही मुलबाळ नाही, अशा महिलेची संपत्ती जिथून मिळवली आहे, तिथेच जाईल. जर महिलेने आई-वडिलांकडून संपत्ती घेतली असेल तर ती संपत्ती पालकांकडेच जाईल. तसेच जर त्या महिलेला संपत्ती पती किंवा सासरच्याकडून मिळाली असेल तर संपत्ती तिच्या वडिलांच्या वारसांकडे जाईल.

दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आले होते. हिंदू उत्तराधिकार कायद्या अंतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठासमोर होते. ५१ पानांच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ लागू होण्यापूर्वी आणि परंपरागत कायद्यात हिंदू महिलेच्या संपत्तीवरील अधिकारांवर चर्चा केली. यादरम्यान सर्वोच्च न्यायलयाने स्पष्ट केले की, हिंदु पुरुषांनी स्वतः कमावलेल्या संपत्तीत आणि वारसाहक्कावर विधवा किंवा मुलीचा हक्क फक्त जुन्या हिंदू प्रथा कायद्यातच नव्हे तर विविध निकालांमध्येही मान्य करण्यात आला आहे.


हेही वाचा – राज्यांना जानेवारीसाठी मिळणार दुप्पट कराची रक्कम, अर्थ मंत्रालयाचा आदेश


 

First Published on: January 21, 2022 10:27 AM
Exit mobile version