कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकार लवकरच घेणार ‘हा’ निर्णय

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकार लवकरच घेणार ‘हा’ निर्णय

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर जगभरात यावर औषध शोधण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. २ वर्ष कोरोनाने अनेकांचे जीव घेतले आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर दोन्ही डोस घ्यावेत, असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. अखेर भारतात देखील कोरोनावर लस विकसीत करण्यात आली असून सरकार लवकरच याबाबत मोठा निर्णय घेणार आहे.

केंद्र सरकारने लसीकरण मोहिम राबवली असून आतापर्यंत करोडो लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही अधिक आहे. २ डोस घेतल्यानंतर तिसरा बुस्टर डोस घेण्यासाठी ९ महिन्यांचं अंतर निश्चित करण्यात आलं आहे. परंतु आता यामध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागर गट गुरूवारी कोरोनाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोसमधील अंतर सध्याच्या नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. हा गट ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हाव्हॅक्स आणि कॉर्बेव्हॅक्स वरील डेटाचे पुनरावलोकन करेल. देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संसर्ग वाढू लागले आहेत. सध्या १२ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांचे लसीकरण केले जात आहे.

दरम्यान, एप्रिलमध्ये देशाच्या औषध नियंत्रक जनरल ऑफ मेडिसिन्सने पाच ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेव्हॅक्स आणि ६ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी Covaxinच्या आतात्कालीन वापरास मान्यात देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यासह मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत.


हेही वाचा :  श्रेय घेणाऱ्या युवराजांनी पालिकेच्या दप्तर दिरंगाईचं उत्तर द्यावे; विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपावरून आशिष शेलार आक्रमक


 

First Published on: June 17, 2022 5:35 PM
Exit mobile version