घरमुंबईश्रेय घेणाऱ्या युवराजांनी पालिकेच्या दप्तर दिरंगाईचं उत्तर द्यावे; विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपावरून आशिष...

श्रेय घेणाऱ्या युवराजांनी पालिकेच्या दप्तर दिरंगाईचं उत्तर द्यावे; विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपावरून आशिष शेलार आक्रमक

Subscribe

जोपर्यंत त्यांच्या नातेवाईकांना समाधान मिळत नाही तोपर्यंत ते महापालिकेच्या विद्यार्थ्यांना या साहित्याची एकही गोष्ट मिळणार नाही का? म्हणून हा सरळ सरळ मुंबईतील विद्यार्थ्यांनी द्रोह शिवसेनेने केलेला आहे. त्यामुळे हा विद्यार्थी द्रोह आहे, असा आरोप शेलारांनी केला आहे

राज्यात 13 जूनपासून शाळा सुरु झाल्या. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी शाळेत पुन्हा हजेरी लावली आहे. यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा वेळेवर सुरु करण्यात आल्या. मात्र मुंबई पालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही शालेय साहित्य मिळाले नसल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. शाळा सुरु झाल्या पण मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य अद्याप निवेदनातचं अडकलं आहे. यावरून भाजप आमदार आशिष शेलारांनी श्रेय घेणाऱ्या युवराजांनी पालिकेच्या दप्तर दिरंगाईचं उत्तर द्यावे अशा शब्दात पालिकेच्या कारभारावर हल्लाबोल केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात ते आज पत्रकारांशी बोलत होते.

“मुंबई महापालिकेचा वाडा मोठा आणि पोकळ वासा”

यावेळी आशिष शेलार म्हणाले की, “मुंबई महापालिकेचा वाडा मोठा आणि पोकळ वासा अशी परिस्थिती आहे. दुदैव आहे की, प्रवेशोत्सव एका बाजूला चालू आहे. वर्तमान पत्रात शिवसेना, महापालिकांच्या वतीने जाहीराती दिल्या जात आहेत. स्वत: युवराज त्याचे श्रेय घेत आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांचे नाव मुंबई पब्लिक स्कुल असे नामांतर केलय. वातावरण मोठं आणि लक्षण खोट अशा पद्धतीचे चित्र आहे.”

- Advertisement -

 “56 हजार कोटींचे फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्या पालिकेने उत्तर द्या”

“शाळा सुरु झाल्या पण वर्षोनोवर्ष पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ साहित्यांच्या गोष्टी मिळाल्याच नाहीत. या गोष्टी काय आहेत तर पेन, पेन्सिल, रेनकोड, कंपास बॉक्स, फुटपट्टी, खोडरबर… या सर्व गोष्टीं विना शाळा कशी सुरु करणार? एका बाजूला राज्य सरकारकडून पाठ्यपुस्तकांची दिरंगाई आहेच आणि दुसऱ्या बाजूला दप्तराविना महापालिकेची शाळा सुरु होते, रेनकोटविना विद्यार्थ्यांना शाळेत बोलवलं जातयं. पेन- पेन्सिल विना त्यांचा अभ्यास घेतला जाणार आहे. वह्यांविना त्यांनी अभ्यास करायचं, मुंबई पालिका 56 हजार कोटींचे फिक्स डिपॉझिट ठेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करत असले तर स्वत: आदित्य ठाकरेंनी याचं उत्तर दिलं पाहिजे. श्रेय घेताना पुढे येताना ना मग या दिरंगाईचं उत्तरही तुम्हालाच द्याव लागेल”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

“मुंबईतील विद्यार्थ्यांनी द्रोह शिवसेनेने केला”

“माहिती समोर येतेय त्यात निविदेला वेळ लागला आहे उशीर झाला आहे? काय झालाय? भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदेंनी पत्र लिहिले की, ही जो उशीर जो झाला आहे त्या उशीराचे कारण अधिकारीचं खाजगीमध्ये सांगतात की, निविदेमध्येही आरक्षण आहे. मग कुठल्या तरी मंत्र्याच्या नातेवाईकाला हे टेंडर हवचं आहे तर हे टेंडर आरक्षित आहे. जोपर्यंत त्यांच्या नातेवाईकांना समाधान मिळत नाही तोपर्यंत ते महापालिकेच्या विद्यार्थ्यांना या साहित्याची एकही गोष्ट मिळणार नाही का? म्हणून हा सरळ सरळ मुंबईतील विद्यार्थ्यांनी द्रोह शिवसेनेने केलेला आहे. त्यामुळे हा विद्यार्थी द्रोह आहे”, असा आरोप शेलारांनी केला आहे.

- Advertisement -

“सात दिवसात काम करा अन्यथा रोषाला सामोरे जा”

“कोण मंत्री आहे याचं नाव पालिकेने जाहीर कराव, शाळा सुरु दप्तर नाही. शाळा सुरु पेन पेन्सिल नाही, शाळा सुरु फुटपट्टी वह्या नाही. उद्धव ठाकरेंच हेच का शाळा बंद आणि शिक्षण सुरु? मुंबई पालिकेवर अन्याय – अत्याचार का होतोय, कंत्राटदारांचा मलिदा ठरत नसेल म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षण विभागाला मलिन करण्याचे काम का चालू आहे? त्यामुळे सात दिवसात त्यांनी हे काम करावं अन्यथा विद्यार्थी रोषाला वाचा भाजप फोडेल,” अशा इशारा आमदार आशिष शेलारांनी दिला आहे.

“शिवसेनेने सत्ताधाऱ्यांनी नालेसफाईत केलेल दिरंगाईचं पाप हे एका व्हिजिटने पुसता येणार नाही. नालेसफाईच्या कामांच्या वेळेला ही सर्व मंडळी कुठे गेली होती? आज मिलन सबवेला पाऊस नसताना येऊन दाखवायचं आणि श्रेय घेयचं याला जनता भुलणार नाही. आदित्य ठाकरे कितीही मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला तरी मुंबईकरांच्या आता मलमपट्टीची नाही तर शस्त्रक्रियेच्या विकासाची गरज आहे आणि त्याच शिवसेना सपशेल फेल ठरली आहे,” असा दावाही शेलारांनी केला आहे.


मोठी बातमी! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी नाकारली


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -