चिन्नी उद्योजकांना घाबरवण्यासाठी दहशतवादी हल्ला – इम्रान खान

चिन्नी उद्योजकांना घाबरवण्यासाठी दहशतवादी हल्ला – इम्रान खान

इमरान खान

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजारात एका मदरशहाजवळ आज मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ३० जण ठार तर ४० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. याअगोदरही म्हणजे आज सकाळीच पाकिस्तानातल्या चीनी दूतावासाजवळ स्फोट झाला. या स्फोटात २ पोलीस आणि ७ जण ठार झाले आहेत. एकाच दिवशी दोन स्फोट झाल्याने संपूर्ण पाकिस्तानात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या स्फोटांमागील कारण हे पाकिस्तान आणि चीन यांच्यात झालेले औद्योगिक करार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – पाकिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले; खैबरमध्ये बॉम्बस्फोटात ३० जण ठार

नेमकं काय म्हणाले इम्रान खान?

इम्रान खान म्हणाले की, चीनी दूतावासावर केलेला हल्ला हा माझ्या चीन दौऱ्यादरम्यान झालेल्या औद्योगिक सामंजस्य करारावरील प्रतिक्रिया होती, हे स्पष्ट आहे. चीनच्या उद्योजकांना घाबरवण्यासाठी आणि सीपीईसी कमकुवत करण्यासाठी हा हल्ला केला गेला आहे. परंतु, हे सर्व केल्याने अतिरेक्यांचे मनसुबे पुर्ण होणार नाहीत, असे खान म्हणाले आहेत.


हेही वाचा – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मोदींना पत्र

First Published on: November 23, 2018 9:52 PM
Exit mobile version