घरदेश-विदेशपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मोदींना पत्र

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मोदींना पत्र

Subscribe

भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध सुधरावे, दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हावी तसंच काश्मीर प्रश्नावर तोडगा काढावा यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इमरान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये नव्याने चर्चेला सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीसोबत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यात एक बैठक व्हावी अशी देखील इच्छा त्यांनी या पत्रामध्ये व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न सोडवले पाहिजे तसंच तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

संबंध सुधारण्याची मागणी

पुढच्या महिन्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारत आणि पारिस्तानचे परराष्ट्र मंत्री एकमेकांना भेटणार नाहीत अशी चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांदरम्यान नव्यानं संबंध सुधारण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे इम्रान खान यांनी या पत्राद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये शांती प्रस्ताव सुरु करावा अशी विनंती केली आहे.

- Advertisement -

चर्चेला पुन्हा सुरुवात करावी

या पत्रात पाकिस्ताननं २०१५ मध्ये सुरू झालेल्या द्विपक्षीय चर्चा पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडलाय. पठानकोट एयरबेसवर दहशतवादी हल्ल्यानंतर ही चर्चा बंद करण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार स्थापनेनंतरचा पहला द्विपक्षीय चर्चेचा औपचारिक प्रस्ताव आहे. यापूर्वी, पंतप्रधान मोदींनीही इमरान खान यांना फोनवर विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सोबतच भेट म्हणून एक क्रिकेट बॅटही पाठवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -