डोनाल्ड ट्रम्प यांनी ७०० दिवसात दिली ७ हजार खोटी आश्वासन

डोनाल्ड ट्रम्प यांनी ७०० दिवसात दिली ७ हजार खोटी आश्वासन

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

खोटे बोलणे ही वाईट सवय असते असे म्हटले जाते तरीही सामाजिक जीवनात अनेकजण खोटे बोलतात. मात्र हे खोटे जर देशाचे राष्ट्राध्यक्ष बोलत असतील तर मात्र ही गंभीर स्थिती आहे. देशाची जबाबदारी असलेले राष्ट्राध्यक्ष जर खोटं बोलत असतील तर  त्या देशांवर विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न जागतिक स्तरावर निर्माण होतो. अमेरिका आज एक महासत्ता आहे. इतर देशांच्या तुलनेत विकसीत देश असला तरीही येथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोटी आश्वासने दिली असल्याची माहिती वॉशिंगटन पोस्ट या वृत्तसंस्थेने दिली आहे. ट्रम्प हे नेहेमी नवीन नियम बनवत असतात. हे नियम अमेरिकेतील जनतेचे हित लक्षात ठेऊन बनवल्या जात असल्याची ग्वाही ते आपल्या प्रत्येक भाषणात देतात. अमेरिकेच्या जनतेला जगात पहिल्या क्रमांवर टीकवून ठेवणार असल्याचे आश्वासन ट्रम्प देतात. मात्र ट्रम्प यांनी मागील ७०० दिवसात ७ हजार खोटी आश्वासने दिली असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. यानंतर ट्रम्प हे फक्त जनतेला खूष करण्यासाठी खोटे बोलत असल्याची टीका राजकीय वर्तुळात होत आहे.

सोशल मीडियाचा होतो वापर

डोनाल्ड ट्रम्प फेसबुक ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात करतात असल्याचे दिसून आले आहे. मागील काही वर्षात देशातील नागरिकांचे मन वळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अमेरिकेत नाही तर भारतातही मागील ३ – ४ वर्षात सोशल मीडियाचा वापर बघायला मिळतो. नुकतेच ट्रम्प यांचे माजी वकिलांना तुरुंगाची शिक्षा ठोठावण्यात आली. ट्रम्प यांनी निवडणुकीदरम्यान रशीयाच्या मदतीने सोशल मीडियाचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात होता.

या मुद्यांवरून बोलले ७,५४६ खोटं

डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकांना भावनिक करण्यासाठी राष्ट्रहिताचे मुद्दे उचलले. त्यांनी घेतलेले निर्णय नेहेमीच चर्चेत राहिले आहे. वॉशिंगटन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प हे ७ हजार ५४६ वेळी लोकांना खोटे बोलले आहे. चुकीची माहिती प्रसारित करुन त्या आधारावर त्यांनी नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली. देशाची अर्थ व्यवस्था,रोजगार, परदेशी निती, टॅक्स व्यवस्था, गुन्हे, दहशदवाद, शिक्षण, व्यापार आणि रशियाशी असलेले संबध या बद्दल खोटे दावे केले असल्याचे वॉशिंगटन पोस्ट ने म्हटलं आहे.

First Published on: December 24, 2018 11:07 AM
Exit mobile version