घरदेश-विदेशदहशतवाद्यांना जिंकू देणार नाही- डोनाल्ड ट्रम्प

दहशतवाद्यांना जिंकू देणार नाही- डोनाल्ड ट्रम्प

Subscribe

२६/११ दहशतवादी हल्ला झेललेल्या भारतीयांसोबत आम्ही आहोत असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला दहा वर्ष पूर्ण झाले आहे. यावेळी अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही शहीदांना श्रंद्धाजली दिली आहे. तसेच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतींया सोबत उभे आहोत असे ते म्हणाले आहे. दहशतवाद्यांशी लढण्यासाठी भारताची साथ आम्हाला पाहिजे आहे. दहावर्षापूर्वी झालेल्या या हल्ल्यात १६० भारतीय आणि ६ अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला होता.  २६/११ च्या दहशतवादी हल्लयाच्या दोषींना पकडून देणाऱ्यांना अमेरिकेने बक्षीस जाहीर केले होते. अमेरिकेचे राज्य सचिव माइक पोम्पो यांनी ५ दशलक्ष डॉलर्स (३५ कोटी) रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

काय म्हणाले ट्रम्प

“मुंबई दहशतवादी हल्ल्याला दहा वर्ष पूर्ण झालीत. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील नागरिक भारतीय जनतेच्या बरोबर उभे आहेत. या हल्ल्यात १६६ जणांनी आपले प्राण गमावले यात ६ अमेरिकेतील नागरिकांचा समावेश आहे. आम्ही दहशतवादा जिंकू देणार नाही.”

- Advertisement -

 

- Advertisement -

अमेरिकेने केले बक्षीस जाहीर

अमेरिकेचे राज्य सचिव माइक पोम्पो यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली दिली. “मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १० व्या वर्षी मी शहीद झालेल्या भारतीय आणि अमेरिकन नागरिकांना अमेरिकन सरकाच्या वतीने श्रद्धांजली देतो. या हल्ल्यात भारतीय आणि सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता त्यांचे कुंटुंब आणि मित्रांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. २६/११ ची क्रूरता सर्व जगाने आपल्या डोळ्यांनी पाहिली. आज दहा वर्षानंतर ही या हल्ल्याचे आयोजन करणारा अजून पकडल्या गेला नाही. आम्ही सर्व देशांना आवाहन केले आहे पाकिस्तानला विशेष की या हल्ल्यातील दोषींना पकडण्यास मदत करावी. त्यांना पकडणेच या शहीदांना न्याय दिल्या सारखे असेल” – राज्य सचिव माइक पोम्पो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -