जेट एअरवेज कंपनीच्या १५ विमानांच्या फेऱ्या रद्द

जेट एअरवेज कंपनीच्या १५ विमानांच्या फेऱ्या रद्द

प्रातिनिधिक फोटो

जेट एअरवेज कंपनी सध्या आर्थिक संकाटातून जात आहे. जेट एअवेज कंपनी भाडे न भरल्यामुळे त्यांना दिलेली विमाने काढून घेण्यात आली आहे. या कारणामुळे जेट एअरवेजला १५ विमाने रद्द करावी लागली. या विमानांमध्या काही आंतरराष्ट्रीय विमानाचाही समावेश आहे. पैसे न भरल्यामुळे जेट एअरवेजच्या इतर ही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये जेट एअरवेजच्या विमानाच्या आणखी काही फेऱ्या रद्द होणार असल्याचे सांगण्यत आले आहे. मागील काही दिवासांपासून जेट एअरवेज हे आर्थिक नुकसानात जात आहे. याचा फटका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणि पायलटांना पडतो.

या आधीही विमाने झाली होती रद्द

विमानांच्या फेऱ्या रद्द करण्याची ही पहिली वेळ नाही. अशा प्रकारच्या घटना या पूर्वीही झाल्या होत्या. पायलट आणि इंजिनयरने काम बंद केले होते. यामुळे देशांतर्गत विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. सेवा मिळत नसल्यामुळे प्रवासी जेट एअरवेजकडे पाठ फिरवतात आहे. याचा फटका कंपनीला बसतो आहे आणि वेळेत पगार न मिळाल्याने कर्मचारी जेट ऐअरवेजला सोडून चाचले आहे.

First Published on: January 30, 2019 2:47 PM
Exit mobile version