घरटेक-वेक एक रुपयाने जेट एअरवेजला केले बर्बाद

 एक रुपयाने जेट एअरवेजला केले बर्बाद

Subscribe

सध्या एक रुपयाला काहीच किमत राहिलेली नाही, असे म्हटले जाते. मात्र या एक रुपयाचे मूल्य काय असते. याचा प्रत्यय जेट एअरवेज या देशांतर्गत विमान कंपनीला आला आहे. या एक रुपयामुळेच जेट एअरवेज रसातळाला गेली. तो एक रुपया असता तर आज जेट एअरवेजला मोठे नुकसान सहन करावे लागले नसते. ही एक रुपयाची कहानी जेटच्या अस्तित्वाची गोष्ट ठरू लागली आहे.

देशांतर्गत सर्वात जुनी विमान कंपनी जेट एअरवेज उपलब्ध सीटमागे प्रतिकिलोमीटर आपली प्रतिस्पर्धी विमान कंपनी इंडिगोच्या तुलनेत १ रुपया जास्त खर्च करते. हा एक रुपयाचा फरक इंधनच्या खर्चाव्यतिरिक्त इतर खर्चावर आधारीत आहे. २०१५ साल संपताना जेटला इंडिगो विमान कंपन्यांच्या तुलनेत प्रत्येक सीटमागे प्रतिकिलोमीटर फक्त ५० पैसे जास्त कमाई होत होती. तेव्हा इंडिगोची मालकी असलेली कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनने जेटला मागे टाकण्याची योजना तयार करून आपले ऑपरेशन २.५ पट वाढवण्यात आले. त्यांनी आपली तिकीटे स्वस्त केली.

- Advertisement -

त्यामुळे त्यांना २०१६ च्या अगोदर नऊ महिन्यांपर्यंत महसुलात प्रति किलोमीटर ९० पैशांचे नुकसान होत होते. तेव्हा जेट प्रति किलोमीटरनुसार आपली तिकीट स्वस्त करू शकली असती तर इंडिगोकडून त्यांना धोबीपछाड मिळू शकला नसता. मात्र जेट एअरवेज तसे करू शकली नाही. त्यातच त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -