पुढच्या 24 तासांत देशातील थंडी कमी होणार; काही भागात पाऊस पडण्याची शक्यता

पुढच्या 24 तासांत देशातील थंडी कमी होणार; काही भागात पाऊस पडण्याची शक्यता

सध्या देशासह राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे राज्यातील अनेक भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेऊ लागले आहेत. दरम्यान, अशातच हवामान विभागाकडून थंडीची लाट कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दिलासादायक बातमीमुळे नागरिक सुखावले आहेत.

थंडीमुळे काही राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 22 आणि 23 जानेवारीला दिल्ली, पंजाबसह हरियाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या काळात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तसेच देशातील मैदानी भागात पाऊस पडू शकतो.

देशातील तापमान होणार वाढ
19 आणि 20 जानेवारी रोजी तापमानात 3 ते 5 अंश सेस्लिअसने वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात गारठा जाणवेल परंतु त्यानंतर थंडीचा जोर ओसरु शकतो.

 


हेही वाचा :

Photo : मुंबई थंडीने गारठली, शाळकरी विद्यार्थी कुडकुडले, पालकांचीही तारांबळ

 

First Published on: January 19, 2023 1:08 PM
Exit mobile version