संतापजनक: मूक बधिर मुलीवर बलात्कार, दगडाने ठेचून केली हत्या!

संतापजनक: मूक बधिर मुलीवर बलात्कार, दगडाने ठेचून केली हत्या!

झारखंडच्या महागामा येथे १३ वर्षीय मुलीबरोबर एक धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी मूक बधिर आहे. ती आठवीत शिकते. या मुलीबरोबर तीच्याच शाळेत तीच्यावर बलात्कार केला. तीच्यावर बलात्कार केल्यानंतर तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मुलीचा मृतदेह शाळेच्या एका खोलीत सापडला.

ही मूक बधिर मुलगी शाळेजवळील गावात रहात होती. महगामा येथील कॉंग्रेसचे आमदार दीपिका पांडे सिंह यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहून गोड्डा जिल्ह्यात एका १३ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराची आणि हत्याची माहिती दिली.

मुलगी शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता होती,  कुटुंबातील सदस्यांनी बराच शोध घेतला पण मुलीचा शोध लागला नाही. रविवारी सकाळी काही जणांनी शाळेच्या आवारात मुलीचा मृतदेह पाहिला. यावेळी मुलीच्या अंगावर अनेक जखमा कुटुंबियांना दिसल्या.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्याची तयारी सुरू केली पण ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पण पोलिसांनी लवकरच आरोपीला पकडू असे आश्वासन दिलं आणि मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला.


हे ही वाचा – मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून त्याने हतोडीने वार करुन तिला संपवलं!


First Published on: August 24, 2020 5:52 PM
Exit mobile version