चीनच्या गुप्त शस्त्रास्त्रसाठ्याचा लागला शोध; सॅटेलाईट फोटोतून चित्र स्पष्ट

चीनच्या गुप्त शस्त्रास्त्रसाठ्याचा लागला शोध; सॅटेलाईट फोटोतून चित्र स्पष्ट

लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तणावाचे वातावरण असतानाच चीन आपल्या सैनिकांचे बळ वाढवत आहेत. दरम्यान, चीनच्या छुप्या मिसाईलचा सुगावा लागला आहे. जमिनी अंतर्गत चीनने हे मिसाईल लपवून ठेवले आहे. याचे स्थान लेहपासून काही अंतरावर आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स (PLARF) ला पहिल्या सेकंड आर्टिलरी कोअरच्या नावाने ओळखले जाते. त्यांची अत्याधुनिक अप अँड रनिंग मिसाईल स्टोरेज फॅसिलिटी लडाखची राजधानी असलेल्या लेहपासून अवघ्या २५० किमी अंतरावर हे मिसाईल ठेवण्यात आले आहे.

इंडिया टुडेच्या ओपन सोर्स इंटेलीजन्स (OSINT) माहितीनुसार या गुप्त शस्त्रास्त्र साठ्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ११ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या सॅटेलाइट फोटोंचे विश्लेषण कण्यात आले आहे. या फोटोतून शस्त्र साठ्याचे ठिकाण हे दक्षिणी शिनजियांग मिलिट्री डिस्ट्रिक्ट (SXJMD) च्या जवळ असल्याचे सांगितले जात आहे. हे डिस्ट्रिक्ट १९५० साली बनवण्यात आले होते. त्यानंतर अनेकदा त्याचे पुनर्गठन करण्यात आले. यात येणाऱ्या क्षेत्रांना समान ठेवण्यात आले आहे. अक्सू, काशगर, यारकंद आणि खोतान यांचा त्यात समावेश आहे.

सौजन्य – आज तक

लडाखच्या समोरचा परिसर ज्यामध्ये आखाती चीन तसेच पूर्व लडाखचा समावेश आहे. ते दक्षिणी शिनजियांग मिलिट्री डिस्ट्रिक्टच्या अंतर्गत १९५० आणि १९६० च्या दशकात समोर आले होते. त्यावेळी चीनने तिबेटवर कब्जा केला होता. SXJMD ला सैदुल्लाह मिलिट्री ट्रेनिंग एरियाच्या स्वरूपातही असल्याचे ओळखले जाते. हे क्षेत्र ब्रिटीशांच्या काळात आर्डन जॉनसन लाईनच्या अंतर्गत भारताने दावा केलेल्या जम्मू आणि काश्मिरच्या अंतर्गत येते.

हेही वाचा –

रेखा यांचा कोरोना चाचणीला नकार; बीएमसीच्या पथकाला घरात घेतले नाही

First Published on: July 14, 2020 6:06 PM
Exit mobile version