India Corona Update: देशात २४ तासांत २,८६,३८४ नव्या रुग्णांची नोंद, ५७३ जणांचा मृत्यू

India Corona Update: देशात २४ तासांत २,८६,३८४ नव्या रुग्णांची नोंद, ५७३ जणांचा मृत्यू

India Corona Update : देशात आज कोरोनाचे 7,554 नवे रुग्ण, तर मृतांची संख्य़ा पून्हा 200 पार

देशात काही दिवसांपूर्वी नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत होती. पण गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कालच्या नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत देशातील आजच्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ४७० रुग्णांची वाढ होऊन गेल्या २४ तासांत २ लाख ८६ हजार ३८४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ५७३ रुग्णांच्या मृत्यू झाला असून ३ लाख ६ हजार ३५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या देशात २२ लाख २ हजार ४७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १९.५९ टक्के झाला आहे. आतापर्यंत १ अब्ज ६३ कोटी ८४ लाख ३९ हजार २०७ लसीकरण झाले आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ४ कोटी ३ लाख ७१ हजार ५००
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ९१ हजार ७००
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ३ कोटी ७६ लाख ७७ हजार ३२८
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – २२ लाख ०२ हजार ४७२
देशातील एकूण चाचण्यांची संख्या – ७२ कोटी २१ लाख ६६ हजार २४८
देशातील एकूण लसीकरणाची संख्या – १ अब्ज ६३ कोटी ८४ लाख ३९ हजार २०७


हेही वाचा – Corona Vaccination: लवकरच कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनला बाजारात उपलब्ध होण्याची मिळणार मंजूरी; जाणून घ्या काय असेल किंमत?


 

First Published on: January 27, 2022 9:43 AM
Exit mobile version