Live Update : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे १० , मुंबईत २ रूग्ण

Live Update : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे १० , मुंबईत २ रूग्ण

Live update Mumbai Maharashtra

राज्यात ओमिक्रॉनचे एकूण १० रूग्ण आढळून आले आहेत. तर मंबईतील २ रूग्ण आढळून आले आहेत.


जॅकलिन फर्नांडिसला ईडीकडून पुन्हा समन्स


बैलगाडा शर्यतीवरील पुढील सुनावणी १५ डिसेंबरला, बैलगाडा शर्यतीवर आजही अंतिम निर्णय नाही


परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, अटक न करण्य़ाचा आदेश कायम


राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडच्या दिशेने रवाना


नाशिकमधून राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लाईव्ह,


नागालँड गोळीबार मुद्द्यावरून संसदेत वाद, राज्यसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित


कर्तव्याची जाण करुन देणारा दिवस – नारायण राणे


मंत्री नवाब मलिक चैत्यभूमीवर दाखल


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार दादर चैत्यभूमीवर परिसरात दाखल झाले आहेत.


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईच्या दादर चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. कोरोना काळात अनुयायांनी गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाने करुनही शेकडोच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत.


माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अटक होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या अटकेपासून संरक्षणाचा आज शेवटचा दिवस, सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी


 

First Published on: December 6, 2021 4:22 PM
Exit mobile version