लग्न टिकवण्यात भारताचा क्रमांक पहिला, ‘या’ देशात होतात सर्वाधिक घटस्फोट

लग्न टिकवण्यात भारताचा क्रमांक पहिला, ‘या’ देशात होतात सर्वाधिक घटस्फोट

Divorce Rate मुंबई | जगभरात घटस्फोटाच्या प्रमाणात सतत वाढ होताना दिसत आहे. जगात कोणत्या देशात किती टक्के घटस्फोटाचे प्रमाण (divorce rate) आहे, ही माहिती वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सने (World of Statistics) जाहीर केली आहे. यानुसार, घटस्फोटाचे प्रमाण सर्वात कमी असलेल्या देशात भारत हा प्रथम क्रमांकावर आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात केवळ १ टक्के घटस्फोट होतात. यातून भारतीय लग्न टिकवण्याला किती महत्व देतात हे समजते. तसेच भारतीय (India) संस्कृतीत लग्नसंस्था आणि कुटुंब व्यवस्थेचे फार महत्त्व आहे.

दरम्यान, वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सने दिलेल्या माहितीनुसार, आशिया खंडातील देशात घटस्फोटाचे प्रमाण हे यूरोप आणि अमेरिका या देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. तर अमेरिका आणि यूरोप या देशात घटस्फोटाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. भारतानंतर व्हिएतनाम या देशात ७ टक्के घस्फोटांचे प्रमाण आहे. तसेच घटस्फोटाचे प्रमाण कमी असलेल्या देशात दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, तुर्की आणि कोलंबियांचाही समावेश आहे. तसेच तजाकिस्तान १० टक्के, इराण १४ टक्के आणि मेक्सिकोमध्ये १७ टक्के घटस्फोटांचे प्रमाण कमी असलेल्या देशात समावेश आहे.

या देशात घटस्फोटाचे प्रमाण जास्त 

जगात सर्वात जास्त घटस्फोट होत असलेल्या यादीत पोर्तुगाल आणि स्पेन हे दोन देश आहेत. यात पोर्तुगाल या देशात घटस्फोटांचे प्रमाण ९४ टक्के आहे. तर स्पेनमधील ८५ टक्के जोडपे घटस्फोट घेण्यात आघाडीवर आहे. तसेच अमेरिकेत ४५ टक्के, डेन्मार्क, दक्षिण कोरिया आणि इटलीमध्ये ४७ टक्के घटस्फोटाचे प्रमाण आहे.

 

First Published on: May 3, 2023 6:16 PM
Exit mobile version