देशभरात ८,८२२ नवीन कोरोना रुग्ण, १५ जणांचा मृत्यू

देशभरात ८,८२२ नवीन कोरोना रुग्ण, १५ जणांचा मृत्यू

मागील अनेक दिवसांपासून देशभरातील कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात नवे ८,८२२ रुग्ण आढळले आहेत. तसेच, १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

बुधवारी आकडेवारी जाहीर करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) सांगितले की, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ५३,६३७ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या १५ जणांपैकी ७ केरळ, २ दिल्ली, ४ महाराष्ट्र आणि १ राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आहेत.

हेही वाचा – मुंबईत कोरोनाची दहशत; ओमिक्रॉन सब व्हेरिएंटचे आढळले चार नवे रुग्ण

आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी महाराष्ट्रातून १,४७,८७५, केरळमधून ६९,८४२, कर्नाटकातून ४०,१०८, तामिळनाडूमधून ३८,०२५, दिल्लीतून २६,२२३, उत्तर प्रदेशातून २३,५२५ आणि पश्चिम बंगालमधून २१,२०६ मृत्यू झाले आहेत. आकडेवारीनुसार, पॉझिटीव्हीटी दर हा 2 टक्क्यांवर पोहचला आहे, तर आठवडी पॉझिटीव्हीटी दर हा २.३५ टक्के आहे.

लसीकरणाविषयी बोलताना, मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-१९ विरोधी लसींचे १९५.५ कोटीहून अधिक डोस देण्यात आल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी देशभरात कोरोनाचे ६,५९४ रुग्ण आढळले होते. अशाप्रकारे मंगळवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आता संक्रमित लोकांची संख्या ४,३२,४५,५१७ झाली आहे.

कोरोना काळात राज्यातील बालकामगारांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली असून जालना, नंदुरबार आणि परभणी या तीन जिल्ह्यामध्ये परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं क्राय या संस्थेनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे.


हेही वाचा – काहीसा दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट; 24 तासात 6594 नवे रुग्ण

First Published on: June 15, 2022 5:36 PM
Exit mobile version