देशभरात २४ तासांत ९ हजार ९८७ नवे रुग्ण; ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशभरात २४ तासांत ९ हजार ९८७ नवे रुग्ण; ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

कोरोना व्हायरस

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ६६ हजार ५९८ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख २९ हजार २१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार ४६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात २४ तासांत १०९ जणांचा बळी

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज कोरोनामुळे १०९ जणांचे बळी गेले आहेत. तसेच एका दिवसात २ हजार ५५३ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ३ हजार १६९ वर पोहोचला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ झाला आहे. तसेच एका दिवसात १ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत राज्यात एकूण ४० हजार ९७५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Corona Live Update: राज्यात २४ तासांत १०९ जणांचा बळी


First Published on: June 9, 2020 9:50 AM
Exit mobile version