भारतीय वंशाच्या गीतांजली रावने जिंकला पहिला ‘TIME’ Award; बनली ‘किड ऑफ दी इयर’

भारतीय वंशाच्या गीतांजली रावने जिंकला पहिला ‘TIME’ Award; बनली ‘किड ऑफ दी इयर’

किशोरी गीतांजली राव

भारतीय वंशाच्या १५ वर्षीय अमेरिकन किशोरी गीतांजली राव हिला तिच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम ‘किड ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. टाइम मासिकने तिला पुरस्कार प्रधान केला आहे. ही एक हुशार वैज्ञानिक आणि संशोधक आहे. टाइमच्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’साठी गीतांजलीची ५ हजार हून अधिक स्पर्धकांमधून तिची निवड झाली आहे.

गीतांजलीने हे केले मोठे काम

किशोरी गीतांजली राव हिने दूषित पिण्याच्या पाण्यापासून ते अफूचे व्यसन आणि सायबर गुंडगिरी या विषयांवर तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगले काम केले आहे. याविषयी तिची मुलाखत घेण्यात आली असून ही मुलाखत अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या एंजोलिना जोली यांनी घेतली आहे. कोलोरॅडोतील तिच्या घरातून जोलीबरोबर डिजिटल संवाद साधताना म्हणाली की, ‘निरीक्षण करा, विचार करा, संशोधन करा, तयार करा आणि सांगा’.

समस्येकडे लक्ष द्या

प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु नका. ज्या समस्येचा तुम्हाला त्रास होत आहे त्या समस्येकडे लक्ष द्या. मी हे करु शकते तर ते कोणीही करु शकतं. विशेष म्हणजे अजूनही खूप काही समस्या आहेत, ज्या जुन्या आहेत. ज्याचा आपण सामना करत आहोत. त्यामध्ये पहिली समस्या म्हणजे मानवी हक्कांच्या समस्येचा सामना आपण अजूनही करत आहोत. या अशा समस्या आहेत ज्या आम्ही तयार केलेल्या नाहीत. पण, हवानाम बदल आणि सायबर गुंडगिरी यासारख्या समस्यांचे तंत्रज्ञानाद्वारे आपण निराकण केले पाहिजे.


हेही वाचा – ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळालेले सोलापूरचे डिसले पहिले भारतीय


 

First Published on: December 4, 2020 4:34 PM
Exit mobile version