कौतुकास्पद! भारतीय वंशाचा ‘विडी’वाला अमेरिकेत बनला न्यायाधीश

कौतुकास्पद! भारतीय वंशाचा ‘विडी’वाला अमेरिकेत बनला न्यायाधीश

surendran patel

नवी दिल्लीः केरळमध्ये विडी बनवणाऱ्या व्यक्तीने अमेरिकेत न्यायाधीश बनण्याचा मान मिळवला आहे. केरळमधील कासारगोड येथे जन्मलेल्या सुरेंद्रन के पटेल यांनी नव्या वर्षात अमेरिकेतील टेक्सासमध्ये फोर्ट बेंड काउंटी जिल्हा न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सुरेंद्रन हे जमिनीशी इमान राखणारे आहेत. गरिबीशी झुंज देत असताना त्यांनी विडी बनवण्याबरोबरच हॉटेलमध्ये कामसुद्धा केले. त्यांना शिकून मोठं व्हायचं होतं.

सुरेंद्रन यांनी १९९२ मध्ये पयन्नूर महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी संपादन केली. यादरम्यान त्यांनी कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी रात्रंदिवस अगदी शनिवार आणि रविवारच्या दिवशीही काम केले. यानंतर सुरेंद्रन यांनी कोझिकोडच्या सरकारी विधी महाविद्यालयात एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यामुळे पटेल यांनी आपल्या शिक्षणाचा मार्ग शोधण्यासाठी शहरातील मालाबार पॅलेस हॉटेलमध्ये हाऊसकीपिंगचं काम केलं. याच काळात त्यांनी १९९६ साली होसदुर्ग येथे वकिली सुरू केली. ज्याची प्रॅक्टिस त्यांनी नऊ वर्षे चालू ठेवली आणि नंतर त्यांची पत्नी सुभा हिला रुग्णालयात परिचारिका म्हणून काम मिळाले, त्यानंतर ते नवी दिल्लीत स्थायिक झाले. सुरेंद्रन यांनी तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. खरं तर सुरेंद्रन यांच्या पत्नीची अमेरिकेतील एका मोठ्या वैद्यकीय सुविधेत काम करण्यासाठी निवड झाली होती आणि तिने कायमस्वरूपी निवासी व्हिसा मिळवला होता. त्यानंतर सुरेंद्रन हे 2007 मध्ये टेक्सासमधील ह्यूस्टन येथे गेले. सुरेंद्रन पटेल यांनी टेक्सासमध्ये बारची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले.

विरोधाचा सामना करावा लागला

युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन लॉ सेंटरमध्ये सुरेंद्रन यांनी एलएलएम परीक्षेसाठी नोंदणी केली आणि 2011 मध्ये ते उत्तीर्ण झाले. कौटुंबिक कायदा, दिवाणी आणि व्यावसायिक खटला, रिअल इस्टेट, फौजदारी संरक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःच्या लॉ फर्मद्वारे सराव सुरू केला. सुरेंद्रन यांच्यासाठी हे सर्व सोपे नव्हते आणि यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर सुरेंद्रन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक सदस्यांच्या निवडणुकीत विद्यमान न्यायाधीशासोबतच्या स्पर्धेत असलेल्या रिपब्लिकन उमेदवाराचा पराभव केला. पटेल यांनी ‘फर्म ऑन लॉ, फेअर ऑन जस्टिस’ हे ब्रीदवाक्य घेऊन निवडणूक लढवली आणि न्याय मिळवण्यासाठी समानतेचा मुद्दा अधोरेखित केला. सुरेंद्रन म्हणाले की, विरोधकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रचाराला सामोरे जावे लागले. कारण त्यांचे उच्चार, जन्मस्थान इत्यादींवरूनही त्यांच्यावर आघात करण्यात आले.

सुरेंद्रन यांनी घालून दिला नवा आदर्श

सुरेंद्रन यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने नवा आदर्श घालून दिला. ते म्हणाले, ‘आम्ही नकारात्मक प्रचाराला प्रतिसाद दिला नाही. पण आपल्या प्रचाराचा नारा आणि आश्वासने घेऊन जनतेत जाण्याचा निर्णय घेतला. लोकांचे उच्चार, दिसणे आणि सांस्कृतिक फरक असणे स्वाभाविक आहे. त्याशिवाय तुम्ही चांगले न्यायाधीश कसे होऊ शकता, असे सुरेंद्रन यांनी सांगितले. त्यांनी पत्नी सुभाच्या हातावरील भगवद्गीतेला स्मरून आणि अमेरिकन राज्यघटनेखाली शपथ घेतली. यादरम्यान पटेल दाम्पत्याच्या मुली अनघा आणि सँड्रा त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. पटेल यांनी ग्रेटर ह्यूस्टनच्या 2,500 सदस्यांच्या मल्याळी असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले होते.


हेही वाचाः चंदा कोचर-दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

First Published on: January 9, 2023 2:40 PM
Exit mobile version