खुशखबर! रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार जेवण आणि कोल्डड्रिंक मोफत, वाचा नेमके कसे?

खुशखबर! रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार जेवण आणि कोल्डड्रिंक मोफत, वाचा नेमके कसे?

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकात ते गाडीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. अशातच आता रेल्वेने आणखी एक सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कारण आता रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये मोफत जेवणासह अन्य सुविधा मिळणार आहेत. येत्या काही दिवसांत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. (indian railways big update now you can get free food and cold drink in train)

मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीकडून मोफत जेवण आणि थंड पेय आणि पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे यासाठी कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. परंतु, ही सुविधा प्रवाशांना तेव्हाच मिळेल जेव्हा प्रवाशांची ट्रेनला उशीर होईल. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनला उशीर झाल्यास IRCTC च्या कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत प्रवाशांना नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते.

आयआरसीटीसीच्या नियमांनुसार प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. परंतु, ही सुविधा तुम्हाला तेव्हाच दिली जाते. जेव्हा तुमची ट्रेन 2 तास किंवा त्याहून अधिक उशीर होईल. एक्स्प्रेस ट्रेनमधील प्रवाशांना ही सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अत्यंत उपयुक्त ठरू शकणार आहे.

ट्रेनमध्ये प्रवाशांना चहा-कॉफी आणि बिस्किटेही नाश्ता मिळतात. याशिवाय प्रवाशांना दुपारी जेवणही मोफत मिळते. कधी कधी त्यात पुर्‍याही दिल्या जातात. जर तुमची ट्रेन 2 तास उशिराने धावत असेल, तर 2 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास तुम्ही नियमानुसार जेवण ऑर्डर करू शकता.


हेही वाचा – ‘राहुल गांधी विदेशी महिलेचा मुलगा, ते देशभक्त असूच शकत नाही’; भाजपाच्या महिला खासदाराचे विधान

First Published on: March 12, 2023 3:02 PM
Exit mobile version