इंदूर दुर्घटनेतील 8 मृत भक्तांच्या कुटुंबीयांचा नेत्रदानाचा निर्णय

इंदूर दुर्घटनेतील 8 मृत भक्तांच्या कुटुंबीयांचा नेत्रदानाचा निर्णय

इंदूर मंदिर दुर्घटनेतील किमान आठ भक्तांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला आहे

इंदूर मंदिर दुर्घटनेतील किमान आठ भक्तांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा आदर्श निर्णय घेतला आहे. मृतांच्या डोळ्यातील काॅर्निया आणि त्वचा प्रत्यारोपणासाठी देण्यास आठ जणांच्या कुटुंबीयांनी होकार दिला आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये विहिरीवरील छत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 35 भाविकांचा मृत्यू झाला होता. रामनवमीच्या दिवसी बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरातील विहिरीवर असलेले छत कोसळून अनेक भक्त आत पडले होते. या घटनेनंतर अनेक कुटुंबांवर दुख:चा डोंगर कोसळला. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी अवयवदानाचा आदर्श निर्णय घेतला आहे.

इंदूरच्या मंदिरातील दु:खद घटनेची माहिती मिळताच, मुस्कान ग्रुपच्या स्वयंसेवक एमवाय हाॅस्पिटलमध्ये दाखल झाले. डाॅक्टर आणि अधिका-यांशी त्यांनी समन्वय साधला आणि नंतर मृतांचे अवयव दान करण्यासाठी शोकाकुल कुटुंबियांशी संवाद साधला. संध्याकालपर्यंत 12 मृतांपैकी आठ जणांच्या कुटुंबियांनी होकार दिला होता.

( हेही वाचा: भारतातील सर्वाधिक महागडी प्रॉपर्टी मुंबईत, ‘या’ उद्योगपतीने खरेदी केला लक्झरी ट्रिप्लेक्स अपार्टमेंट )

इंद्र कुमार, भूमिका खानचंदानी, जयंती बाई, दक्षा पटेल, लक्ष्मी पटेल, भारती कुकरेजा आणि कनक पटेल या आठ मृत भाविकांच्या कुटुंबीयांच्या मान्यतेने हे अवयव दान शक्य झाले आहे, असे मुस्कान ग्रुपचे स्वयंसेवक सांदिपन आर्य यांनी सांगितले. त्यातील तिघांकडून त्वचाही प्रत्यारोपणासाठी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एमके इंटरनॅशनल, एमवायएच आणि शंकरा नेत्रपेढीला डोळ्यातील काॅर्निया दान करण्यात आले, तर चोइथराम हाॅस्पिटलला मृत व्यक्तींची दान केलेली त्वचा देण्यात आल्याचे, आर्य म्हणाले.

( हेही वाचा: कोरोनात मृत्यू पावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास 50 लाखांची मदत मंजूर; राज्यातील पहिलीच मदत )

मृत भाविकांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर

मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात गुरुवारी रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिराचा काही भाग कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू झाला होता. या दूर्घटनेत 18 जणांना वाचवण्यात यश आले होते. या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

First Published on: March 31, 2023 8:12 PM
Exit mobile version