वेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट, व्हिडिओ अपलोड केला पॉर्न साईटवर!

वेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट, व्हिडिओ अपलोड केला पॉर्न साईटवर!

वेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट, व्हिडिओ अपलोड केला पॉर्न साईटवर

वेबसीरिजच्या नावाखाली एका व्यक्तीने तरुणींकडून अडल्ट शूट करून ते पॉर्न वेबसाईटला विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तीला मध्य प्रदेशच्या इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. २५ जुलै रोजी एका मॉडेलने या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला होता.

वास्तविक इंदूरमध्ये मॉडेल म्हणून काम करणाऱ्या तरुणीने २५ जुलै रोजी एका सायबर सेलमध्ये या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला होता. यामध्ये तिने सांगितले की, ‘वेबसीरिजच्या नावाखाली अडल्ट शूट केले आणि ते पॉर्न वेबसाईटवर दिले. यासाठी इंदूरच्या एका फार्म हाऊस देखील बुक केला होता’. तरुणींने दाखल केलेल्या एफआयआरमधील आरोपींपैकी दोन आरोपी मिलिंद डावर आणि अंकिता सिंह यांना पहिल्यांदा अटक केली. त्यानंतर या आरोपींच्या चौकशीच्या आधारे मुख्य आरोपी बिजेंद्र सिंहचा शोध घेतला.

मुख्य आरोपी ब्रिजेंद्र सिंह इंदूरमध्ये असून तो जामिनासाठी प्रयत्न करीत आहे. तसेच आरोपी मयूर रुग्णालयात कोणाला तरी भेटायला जात असल्याची माहिती सायबर सेलला मिळाली. मग या माहितीच्या आधारे सायबर सेलने सापळा रचला आणि मुख्य आरोपी बिजेंद्र सिंह याला अटक केली. मुख्य आरोपींने चौकशी दरम्यान कबुली दिली की, ‘त्याने वेबसीरिजच्या नावाखाली अडल्ट फिल्मचे शूट केले आणि पॉर्न वेबसाईटवर दिले.’

आरोपी रॅकेटचा केला खुलासा

पुढे मुख्य आरोपी म्हणाला की, पॉर्न वेबसाईटचे धंदे हे मिनी मुंबई म्हणजे इंदूर ते मायानगरी मुंबईपर्यंत जोडले आहेत. मुंबईत बसून अशोक सिंह आणि विजयनंद पांडे नावाचे दोन व्यक्ती देशभरात अडल्ट फिल्म तयार करून हे रॅकेट चालवत असल्याचा खुलासा या आरोपीने केला.

तसेच अडल्ट चित्रपट, पॉर्न वेबसाईट, अडल्ट वेबसाईट, ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे अडल्ट कंटेंटची चांगली मागणी असून यामध्ये लाखो रुपये एका वेळेत मिळतात. या रॅकेट मधला आरोपी मिलिंद डावरने फॅशन शो आणि Addसाठी बॅकग्राऊंड आर्टिस्ट आणि कास्टिंगचे काम केले आहे. हा आरोपी आपला व्यवसाय एमडीएफएम मॉडेलिंग एजेंसीच्या नावावर चालवतो. तसेच आरोपी अंकित चावडा एनएमएच फिल्ड प्रोडक्शन हाऊसमध्ये कॅमेरामॅन ऑपरेटर म्हणून काम करतो.

तसेच चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, ‘तरुणींना प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसेसच्या वेबसीरिजमध्ये काम करायचा बहाणा करून त्यांच्याकडून अडल्ट शूट करत होतो. बिजेंद्र स्वतः दिग्दर्शन असल्याचे सांगून एका फार्म हाऊसमध्ये अडल्ट शूट करत होता.’ सध्या तक्रार केलेल्या मॉडेलपैकी अजून किती मॉडेल तरुणींनी याला बळी पडल्या आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.


हेही वाचा – नवविवाहीत पोलिसाने डोक्यात गोळी झाडून आपलं जीवन संपवलं!


 

First Published on: August 11, 2020 11:14 AM
Exit mobile version