घरताज्या घडामोडीनवविवाहीत पोलिसाने डोक्यात गोळी झाडून आपलं जीवन संपवलं!

नवविवाहीत पोलिसाने डोक्यात गोळी झाडून आपलं जीवन संपवलं!

Subscribe

झारखंडमधील जमशेदपूर येथे होम क्वारंटाइन असलेल्या एका पोलीस जवानाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नुकतच या जवानाचं लग्न झालं होतं. पोलीस कर्मचारी वसाहतीत तो पत्नीसोबत क्वारंटाइन होता. सोमवारी अचानक त्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. त्यामुळे त्याच्या कुटुबीयांना मोठा धक्का बसला असून पत्नीची तर प्रकृतीच बिघडली आहे.

तरूण पांडे नामक हा पोलीस बिहारच्या नालंदा जिल्ह्याचा रहिवासी होता. एख उत्तम खेळाडू म्हणूनही तो ओळखला जात असे. नॅशनल चॅम्पियन झाल्यानंतर त्याला थेट पोलीस विभागात नोकरी मिळाली होती. त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

- Advertisement -

पोलिसाची पत्नी या धक्क्यातून सावरल्यानंतर पोलीस तिची चौकशी करणार आहेत. घटनेच्या दिवशी नेमकं काय झाल?  भांडणं झालं की तो कुठल्या अडचणीत होता याचीही चौकशी केली जाणार आहे.

खेळाडूवृत्तीच्या पोलिसाने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याबद्दल त्याच्या मित्रांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. पत्नी दुसऱ्या खोलीत असतांना त्याने दार बंद करून गोळ्या झाडल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळ्यांच्या आवाज ऐकून आसपासचे शेजारीही धावत आले त्यावेळी तरुण हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

- Advertisement -

हे ही वाचा – White House बाहेर गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -