श्रीलंकेत अडकलेल्या ७०० भारतीयांनी घेऊन ‘INS जलाश्व’ तामिळनाडूत दाखल

श्रीलंकेत अडकलेल्या ७०० भारतीयांनी घेऊन ‘INS जलाश्व’ तामिळनाडूत दाखल

'INS जलाश्व'

वंदे भारत मिशन अंतर्गत अडकलेल्या भारतीयांना परदेशात आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन समुद्र सेतू सुरू केले आहे. ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत नौसेना विविध देशांतील भारतीयांना वेगवेगळ्या जहाजांद्वारे आपल्या मायदेशी परत आणण्याचे कार्य करत आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत समुद्रमार्गे विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस जलाश्वने श्रीलंकेत अडकलेल्या तब्बल ७०० भारतीयांना सुखरूप परत भारतात परत आणले आहे. कोलंबो येथून आयएनएस जलाश्व तमिळनाडूमधील तुतीकोरिन येथे पोहोचले आहे.

वंदे भारत मिशन अंतर्गत भारतीय नौदल ऑपरेशन समुद्र सेतूच्या माध्यमातून अनेक जहाजाद्वारे हजारो भारतीयांना वेगवेगळ्या देशांमधून आपल्या मायदेशी परत आणण्याचे काम करत आहे. आयएनएस जलाश्वला मे २०१७ साली श्रीलंकेतील भीषण पूर परिस्थिती दरम्यान मदत कार्यासाठी देखील पाठविण्यात आले होते.

यावेळी श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी सर्व परत आलेल्या भारतीयांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि श्रीलंकेच्या सरकारचे आभार देखील मानले.


परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी ‘वंदे भारत मिशन’

 

First Published on: June 2, 2020 6:18 PM
Exit mobile version