INS Viraat: ३० वर्षांच्या सेवेनंतर युद्धनौका INS विराट यार्डाकडे रवाना

INS Viraat: ३० वर्षांच्या सेवेनंतर युद्धनौका INS विराट यार्डाकडे रवाना

भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस विराट आज तिच्या अखेरच्या जलप्रवासाला मार्गस्थ झाली आहे. ६ मार्च २०१७ साली नौदलाच्या सेवेतून ही युद्धनौका निवृत्त झालेली होती. राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे युद्धनौका आता भंगारात जाणार आहे.

सर्वाधिक काळ सेवेत दाखल झालेल्या आयएनएस विराट या लढाऊ विमान वाहक जहाजाचा आज अंतिम प्रवास मुंबईहून गुजरताच्या दिशेने सुरु झाला आहे. गुजरात मधील अलंग स्थित असलेल्या जहाज तोडणाऱ्या यार्डकडे ते नेले जात आहे. नौसेत विराट जहाजाला ‘Grand Old Leady’ असे सुद्धा संबोधले जाते. अलंग स्थित श्रीराम ग्रुपने या ऐतिहासिक लढाऊ विमान वाहक जहाजाची ३८.५४ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या नावावर केले. हे एकमेव असे लढाऊ विमान वाहक जहाज आहे त्याने ब्रिटेन आणि भारत नौसेनेला सेवा दिली आहे.

आयएनएस विराट २०१७ साली निवृत्त झाल्यानंतर त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धसंग्रहालयात रूपांतर करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काही होऊ शकली नाही. त्यामुळे नौदलाने तीन वर्ष वाट पाहून गेल्या वर्षी आयएनएस विराट भंगारात काढण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर आता तिच्यावरील सर्व सुरक्षात्मक संवेदनशिल ठरू शकणाऱ्या यंत्रणा नौदालाने काढून घेण्यात आल्या आहे. आयएनएस विराट ही आता एका खासगी स्क्रॅप कंपनीला भंगारात काढण्यासाठी सोपवण्यात आली आहे.

आज दुपारी १२ च्या सुमारास आयएनएस विराट आपला अखेरचा जलप्रवासला निघाली आहे. गुजरातमधील अलंग येथील जहाज तोडणी शिपयार्डच्या दिशेनं तिने प्रवास सुरू केला आहे. यावेळी तीला टग बोटने टो करून घेऊन जाण्यात येणार आहे. २९ वर्षाच्या भारतीय नौदलाच्या सेवेतून निवृत्त होऊन आयएनएस विराटही आयएनएस विक्रांत प्रमाणे अखेर भंगारात जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विराट सेंटोर श्रेणीतील लढाऊ वाहून नेणारे जहाज आहे. २२६ मीटर लांब आणि ४९ मीटर रुंद अशा या युद्धाच्या जहाजाचे वजन २७,८०० टन आहे. १९८४ मध्ये भारताने हे खरेदी केले होते आणि १९८७ मध्ये भारतीय नौसेनाने आयएनएस विराट नावाने ते आपल्यात सामील करुन घेतले. येथे आयएनएस विक्रांत सोबत त्याची पेअर करण्यात आली. १९९७ मध्ये विक्रांत सेवानिवृत्त झाली त्यानंतर जवळजवळ २० वर्ष एकट्याने भारताच्या समुद्र सीमांवर लक्ष ठेऊन होती.

भारतात येण्यापू्र्वी ब्रिटेनची रॉयल नेव्ही एचएमएस र्हिमसच्या रुपात २५ वर्ष आपली सेवा त्याने दिली होती. ब्रिटेनच्या रॉयल नेव्हीचा हिस्सा होती त्यावेळी प्रिंस चार्ल्सने या जहाजावर नौसाना अधिकाऱ्यांची आपली ट्रेनिंग पूर्ण केली होती. फॉकलँन्ड युद्धात ब्रिटिश नेव्हीसाठी या जहाजाने महत्वपूर्ण भुमिका पार पाडली होती.


सरदार तारासिंग यांनी २०१५ मध्येच सांगितलं होतं, ‘हस्तांदोलन सोडा, नमस्कार करा!’
First Published on: September 19, 2020 3:26 PM
Exit mobile version