घरताज्या घडामोडीSardar Tara Singh: 'हस्तांदोलन सोडा, नमस्कार करा', कोरोनाच्या ५ वर्ष आधी केली...

Sardar Tara Singh: ‘हस्तांदोलन सोडा, नमस्कार करा’, कोरोनाच्या ५ वर्ष आधी केली होती भविष्यवाणी

Subscribe

तारासिंग यांचं 'ते' वक्तव्य पुन्हा चर्चेत

मुलुंडमधील भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचं वृद्धापकाळानं नुकतंच निधन झालं. मुलुंडमध्ये तारासिंग यांनी केलेल्या कामामुळे स्थानिकांमध्ये त्यांना आदराचं स्थान होतं. गेल्या ३० वर्षांपासून सरदार तारासिंग मुलुंडमधले भाजपचे आमदार राहिले. मात्र, २०१९ साली झालेल्या राज्यातल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या वयाचं कारण पुढे करत त्यांना तिकिट नाकारण्यात आलं. तेव्हापासून ते सक्रिय राजकारणापासून लांबच होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांनी २०१५ साली केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तारासिंग यांनी तेव्हा केलेलं विधान अधिकच समर्पक ठरलं आहे.

तारासिंग यांचं ‘ते’ वक्तव्य पुन्हा चर्चेत

राज्यात सध्या कोरोनाची साथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना भेटताना हस्तांदोलन करून परस्पर संपर्क टाळून फक्त नमस्कार करा, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, हीच भूमिका सरदार तारासिंग यांनी चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये मांडली होती. त्यासाठी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात ते विशिष्ट पेहेराव करून देखील आले होते. त्यावेळी विधानभवनात त्यांनी केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

- Advertisement -

‘हस्तांदोलन नको, नमस्कार म्हणा’

२०१५मध्ये राज्यात स्वाईन फ्ल्यूची साथ आली होती. त्यामध्ये मुंबईत देखील रुग्ण सापडत होते. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशनात सरदार तारासिंग यांनी हा मुद्दा विधानभवनात उपस्थित केला होता. यावेळी ते स्वाईन फ्ल्यूसंदर्भात सवाल उपस्थित करणारं पोस्टर देखील अंगावर चढवलं होतं. यावेळी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना तारासिंग म्हणाले, ‘हे जरी भाजपचं म्हणजे आमचंच सरकार असलं, तरी इथे स्वाईन फ्ल्यूचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ लागला आहे. मी ऐकलंय की राजस्थानमध्ये हस्तांदोलन न करता नमस्कार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने देखील अशाच प्रकारे हस्तांदोलन न करता नमस्कार करण्यावर भर द्यायला हवा’. असं म्हणताना आपल्याच पक्षाच्या सरकारला सुनावण्यातही तारासिंग मागे राहिले नाहीत.


हे वाचा –  मुलुंडचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -