अमेरिकी सेनेच्या सी – १३० विमानाला इराकमध्ये अपघात; चार सैनिक जखमी

अमेरिकी सेनेच्या सी – १३० विमानाला इराकमध्ये अपघात; चार सैनिक जखमी

सौजन्य - आज तक

इराकमध्ये अमेरिकी सेनेचे एक विमान क्रॅश झाले असून राजधानी बगदादपासून उत्तर दिशेला स्थित असलेल्या इराकी सैन्य स्थळावर सोमवारी हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या अपघाताबाबत अमेरिकी सैन्यांच्या प्रमुखांनी अपघाताची माहिती दिली. सेनेच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात चार सैनिक जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच हा अपघात कसा झाला याचा तपास केला जाईल, अशीदेखील माहिती त्यांनी दिली. समाचार एजंसी असोसिएटेड प्रेस यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकीच्या सैन्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेचे प्रवक्ते माईल्स कॅगिन्स यांनी हा केवळ अपघात असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – …मग महाराष्ट्र बनाना रिपब्लिक आहे का?

काय म्हणाले माईल्स कॅगिन्स

इराकच्या सैनिकी कॅम्पवर अमेरिकी सैन्याचे विमान सी – १३० याला अपघात झाला असून हे विमान भींतीला जाऊन धडकले. त्यामुळे विमान क्रॅश झाले असून त्याला आग लागली. तर इराकच्या सेना अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या विमानात सैन्य दलाच्या चालकासह सात सदस्य आणि २६ प्रवाशांचा समावेश होता. तसेच दोन पायलट यामध्ये जखमी झाले असून त्यांनी इराकी सेनेच्या बगदाद विमानतळाजवळच एका मिसाईलला टक्कर देण्याचाही दावा केला आहे.

First Published on: June 9, 2020 7:58 AM
Exit mobile version