इस्तंबूल बॉम्बस्फोटप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात, स्फोटात 6 जणांचा मृत्यू

इस्तंबूल बॉम्बस्फोटप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात, स्फोटात 6 जणांचा मृत्यू

तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमधील इस्तिकलाल स्ट्रीटवर रविवारी बॉम्बस्फोटाची घटना घडली. या स्फोटात जवळपास सहा जणांचा मृत्यू झाला असून 80 हून अधिक जखमी झाले आहेत. तुर्कस्तानमधील इस्तिकलाल हा अतिशय गजबजलेला मार्केट परिसर असून दररोज हजारो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. यामुळे रविवारी झालेल्या स्फोटामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बॉम्बस्फोटाप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली आहे. सोबतचं जवळपास बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फूटेडच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेनंतर स्फोटाच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या हल्ल्यामागे कुर्दांचा हात असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतानेही या घटनेचा निषेध केला आहे.


मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

First Published on: November 14, 2022 9:07 AM
Exit mobile version