करोनाचे थैमान; इटलीच्या वर्तमानपत्राने तब्बल १० पानं छापल्या श्रद्धांजलीच्या जाहीराती

करोनाचे थैमान; इटलीच्या वर्तमानपत्राने तब्बल १० पानं छापल्या श्रद्धांजलीच्या जाहीराती

इटलीतील वृत्तपत्रात १० पानं श्रद्धांजलीच्या जाहीराती छापण्यात आल्यात

करोना व्हायरसने सध्या जगभरात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. चीननंतर आता इटलीत करोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. इटलीत करोनाची दहशत किती पसरली आहे, याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. इटलीतील बर्गामो शहरातील एका वृत्तपत्राने ९ फेब्रुवारी रोजी दीड पान श्रद्धांजलीच्या जाहीराती छापल्या होत्या. त्यानंतर आता १३ मार्च रोजी याच वृत्तपत्राने तब्बल १० पाने श्रद्धांजलीच्या जाहीराती छापल्यामुळे जगभरातील लोकांना धक्काच बसला आहे. इटलीमध्ये आजमितीस तब्बल १८०० लोकांनी करोनामुळे आपला जीव गमावला असल्याचे समोर आले आहे.

सिल्विया मेर्लेर यांनी ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बर्गामोमधील वृत्तपत्र चाळतानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला आहे. या व्हिडिओत तब्बल १० पाने करोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल श्रद्धांजली व्यक्त करण्यात आल्याच्या जाहीराती छापण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळेच सिल्व्हिया यांनी घरीच थांबा असा सल्ला सर्वांना दिला आहे.

इटलीने स्वतःला काही आठवड्यांपासून बंदिस्त करुन घेतले आहे. इटलीतील मोन्झा रुग्णालयाच्या डॉ. रॉबर्ट रोना यांनी म्हटले आहे की, करोनाची लाट नसून त्सुनामी आली आहे. मागच्या २४ तासात ३६८ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या २१,१५७ वरुन २४,७४७ वर पोहोचलेला आहे.

First Published on: March 16, 2020 11:25 AM
Exit mobile version