आयटीआर भरण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरा आयकर रिटर्न

आयटीआर भरण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरा आयकर रिटर्न

नवी दिल्ली – इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची तारीख अर्थ मंत्रालयाने (Finance Minister) पुन्हा एकदा वाढवली आहे. मात्र या वाढीव तारखेचा फायदा केवळ कंपन्यांना होणार आहे. मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कंपन्यांकडून आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर होती. आता ही मुदत वाढवून ७ नोव्हेंबर करण्यात आली आहे.

हेही वाचा – दिवाळीच्या तेजात शेअरबाजारात तेजी, निर्देशांक 524.51 तर, निफ्टीत 154.50ची उसळी

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes) एक नोटीस जारी करून सांगितलं की, गेल्या महिन्यात ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची वेळ वाढवली होती. त्यामळे आयटीआर दाखल करण्यासाठीही मुदत वाढवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी अधिनियम कलम १३९ अंतर्गत कर भरण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. पूर्वी ३१ ऑक्टोबरपर्यंत मर्यादा दिली होती. आता ही मर्यादा वाढवून ७ नोव्हेंबर करण्यात आली आहे.

देशांतर्गत कंपन्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आर्थिक वर्ष २०२१-२०२२ साठी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. ज्या कंपन्यांची हस्तांतरण किंमत प्रक्रिया अंतर्गत आहे, त्यांच्यासाठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ असणार आहे.

हेही वाचा – ऑनलाइन शॉपिंगचा धूमधडाका, ई-कॉमर्स कंपन्यांचा प्रभाव दिवाळीवर

एएमआरजी अँड असोसिएट्सचे संचालक (कंपनी आणि आंतरराष्ट्रीय कर) ओम राजपुरोहित यांनी सांगितले की, मुदत वाढवल्याने सणासुदीच्या काळात खूप आवश्यक दिलासा मिळेल. गेल्या महिन्यात सीबीडीटीने लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची मुदत सात दिवसांनी वाढवून 7 ऑक्टोबरपर्यंत केली होती.

First Published on: October 27, 2022 9:10 AM
Exit mobile version